DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

गुरूकृपा मल्टिपर्पज (मल्टिस्टेट) को -ऑपरेटीव्ह सोसायटी लि. पतसंस्थेचा शुभारंभ खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते संपन्न

को -ऑपरेटीव्ह संस्था कष्टकरी माणसाच्या पाठीशी उभे राहण्यासाठी उपयोगी पडतात - खासदार श्रीरंग बारणे

DD News Marathi by DD News Marathi
August 30, 2022
in ताज्या बातम्या
0
गुरूकृपा मल्टिपर्पज (मल्टिस्टेट) को -ऑपरेटीव्ह सोसायटी लि. पतसंस्थेचा शुभारंभ खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते संपन्न

पुणे  प्रतिनिधी :

दि. 30 ऑगस्ट 2022 :

पुण्यनगरी ही अशी जागा आहे जिथे कोणीही उपाशी झोपले नाही. या शहाराने कोणाला तसे झोपूही दिले नाही. मी इथला भूमीपुत्र आहे. इथल्या कष्टकरी माणसाच्या पाठीशी उभे राहण्यासाठी, अर्थ सहाय्य करण्यासाठी को -ऑपरेटीव्ह संस्था उपयोगी पडतात, असे मत खासदार श्रीरंग बारणे यांनी आज व्यक्त केले.

गुरूकृपा मल्टिपर्पज (मल्टिस्टेट) को -ऑपरेटीव्ह सोसायटी लिमिटेड या पतसंस्थेचा शुभारंभ आज खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिव व्याख्याते नामदेवराव जाधव, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, गुरूकृपा मल्टिपर्पज (मल्टिस्टेट) को -ऑपरेटीव्ह सोसायटीच्या चेअरमन श्रावणी संतोष चव्हाण आणि एस स्क्वेअर एंटरटेनमेंट आणि सर्वज्ञ नाट्य संस्थेचे अध्यक्ष संतोष चव्हाण, सहकार आयुक्त पुणे अनिल कवडे, पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, आमदार सुनील शेळके, आमदार महेश लांडगे, आमदार अण्णा बनसोडे, माजी नगरसेवक शंकर जगताप, माजी नगरसेविका सुमन पवळे, माजी नगरसेवक सचिन चिखले, माजी नगरसेविका पौर्णिमा सोनवणे, माजी नगरसेवक प्रवीण भालेकर, माजी नगरसेविका संगीता ताम्हाणे, माजी नगरसेवक पंकज भालेकर, शांताराम द. भालेकर, शांताराम को. भालेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

सर्वसामान्य नागरिकांना अर्थसहाय्य करण्यासाठी शहराच्या विविध भागात अशा प्रकारच्या संस्था कार्यरत आहेत. या संस्था गरजू व्यक्तींना कर्जाच्या माध्यमातून मदत करत असतात. संतोष चव्हाण यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. भूमीपुत्र या नात्याने जी काही मदत लागेल ती मी करेन असे खासदार श्रीरंग बारणे म्हणाले,

मेघराजराजे भोसले म्हणाले, चित्रपट, नाट्य निर्माते संतोष चव्हाण यांनी कोरोना काळात कलाकारांसाठी मोठे काम केले आहे. कलावंतांच्या पाठीशी सदैव उभे राहणारे चव्हाण आता सर्वसामान्य नागरिकांसाठी पतसंस्थेच्या माध्यमातून पुढे येत आहेत.

एस स्क्वेअर एंटरटेनमेंट आणि सर्वज्ञ नाट्य संस्थेचे अध्यक्ष संतोष चव्हाण म्हणाले, सर्वसामान्य आणि गरजू लोकांसाठी गुरूकृपा मल्टिपर्पज (मल्टिस्टेट) को -ऑपरेटीव्ह सोसायटी काम करेल. कलाकार आणि तंत्रज्ञ याच्या पाठीशी उभे राहण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.

 

बातमी नक्की शेअर करा
Tags: #Cooperativesociety #पतसंस्था
Previous Post

4 ऑगस्ट रोजी संपन्न होणार्‍या टाकळी हाजी ग्रामपंचायत 2022-2027 च्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘मळगंगा ग्रामविकास पॅनल’चा विजय निश्चित

Next Post

410 कोटींमध्ये बनलेला ‘ब्रह्मास्त्र’ फ्लॉप? रेकॉर्डब्रेक कमाईचे दावे खोटे?

Next Post
410 कोटींमध्ये बनलेला ‘ब्रह्मास्त्र’ फ्लॉप? रेकॉर्डब्रेक कमाईचे दावे खोटे?

410 कोटींमध्ये बनलेला 'ब्रह्मास्त्र' फ्लॉप? रेकॉर्डब्रेक कमाईचे दावे खोटे?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.