DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

सुटकेनंतर संजय राऊतांचे सर्वप्रथम नाशिकचा दौरा करण्याचे संकेत

नाशिकच्या शिवसेना नेत्यांनी भेट घेऊन खासदार संजय राऊत यांचे जोरदार स्वागत केले

DD News Marathi by DD News Marathi
November 10, 2022
in राजकीय
0
सुटकेनंतर संजय राऊतांचे सर्वप्रथम नाशिकचा दौरा करण्याचे संकेत

मुंबई प्रतिनिधी :

दि. 10 नोव्हेंबर 2022

`ईडी`च्या कारवाईनंतर न्यायालयाने काल जामीनावर मुक्त केलेल्या शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांची आज नाशिकच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. यावेळी श्री.
राऊत यांनी लवकरच नाशिकचा दौरा करणार असल्याचे संगितले. यावेळी त्यांनी पक्षाची संघटनात्मक घडी अधिक प्रभावी करण्यात येईल, असेही सांगितले.
खासदार राऊत यांच्या मुंबई येथील निवासस्थानी आज सकाळपासूनच विविध भागातून कार्यकर्ते, नेत्यांची भेटीसाठी मोठी गर्दी होती. यातील बुहतांशी नागरिकांशी त्यांनी चर्चा करून
त्यांच्या सूचना ऐकल्या.

यावेळी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, शिवसेनेचे विरोधक कितीही प्रयत्न करोत, मार्गात कितीही अडथळे आणोत, शिवसेना आपल्या मार्गाने खंबीरपणे
चालत राहील. आजवरचा इतिहास हाच आहे. त्यात बदल होणार नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला लवकरच आधीपेक्षाही अधिक चांगले दिवस येतील,
याबाबत मला काहीही शंका नाही.

यावेळी माजी आमदार गिते, माजी महापौर विनायक पांडे यांनी त्यांना शुभेच्छा देऊन, त्यांना नाशिकच्या परिस्थितीची सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी संगितले, नाशिकची
शिवसेना भक्कम आहे. सर्व नेते, पदाधिकारी जागरूकपणे काम करीत आहेत. बंडखोर गट तसेच फुटीचे कारस्थान करणारी मंडळी आजही दिवसरात्र लहान लहान कार्यकर्त्यांची
दिशाभूल करून त्यांना ओढण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र त्यात ते यशस्वी होणार नाहीत. नाशिकमध्ये शिवसेना भक्कम राहिल्याने विरोधकांचीच झोप उडाली आहे.

यावेळी खासदार राऊत म्हणाले, यापुढे अधिक जागरूक व आक्रमकपणे सर्वांनी एकोप्याने काम करायचे आहे. मी लवकरच पक्षाच्या संघटनात्मक वाढीसाठी दौरे करतो आहे. यात
सर्वात आधी नाशिकला येण्याचा माझा प्रयत्न असेल. या दौऱ्यात महापालिकेसह आगामी सर्व निवडणुकांना सामोरे जाण्याचे आपण नियोजन करू.

शिवसेनेविरोधात झालेल्या राजकीय षडयंत्रातून उद्धव ठाकरे यांना पायउतार व्हावे लागले. सध्या तर सत्तेत असलेली मंडळी सतत शिवसेनेच्या विरोधात कारस्थाने करीत आहे. हे
लोकांना आजिबात पसंत पडलेले नाही. त्यामुळे साहजिकच लोकभावना शिवसेनेबरोबर आहे.

मुंबई येथील राऊत यांच्या निवासस्थानी शिवसेनेचे उपनेते सुनिल बागूल, माजी आमदार वसंत गिते, माजी महापौर विनायक पांडे, दत्ता गायकवाड आणि राजेंद्र देसाई यांनी
गुलाबाच्या फुलांचा मोठा हार देऊन खासदार संजय राऊत यांचे स्वागत केले.

 

बातमी नक्की शेअर करा
Tags: #ED#SanjayRaut#sanjayrautbail#sanjayrautreleased
Previous Post

नाशिक महापालिकेत वर्चस्वासाठी शिंदे गटाच्या हालचाली?

Next Post

संजय राऊत यांच्या सुटकेमुळे शिवसेनेचे मनोबल वाढणार?

Next Post
संजय राऊत यांच्या सुटकेमुळे शिवसेनेचे मनोबल वाढणार?

संजय राऊत यांच्या सुटकेमुळे शिवसेनेचे मनोबल वाढणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

October 17, 2025
राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

October 17, 2025
‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

October 17, 2025
कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

October 16, 2025
प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

October 16, 2025
मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

October 16, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.