नाशिक प्रतिनिधी :
दि. 10 नेव्हेंबर 2022
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्यामुळे, राज्यात सत्तांतर झाल्यावर, शिवसेनेवर शिंदे गटाचा जो दबाव नाशिकमध्ये वाढत
होता त्याला चाप बसणार आहे. आगामी नाशिक महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक, नेते व कार्यकर्त्यांना यामुळे बळ मिळेल. साहजिकच शहरातील पदाधिकारी यामुळे उत्साहात
आहेत.
खासदार राऊत यांच्या विरोधात `ईडी`ने कारवाई केल्यानंतर नाशिक शहरात विस्ताराच्या दृष्टीने पालकमंत्री दादा भुसे आणि भाजप या दोघांचेही मनोबल वाढले होते. शिवसेनेच्या
नेते, पदाधिकारी व माजी नगरसवेकांना आपल्या गटात सामील करण्यासाठी त्यांनी विविध मार्गांनी प्रयत्न सुरु केले होते. संजय राऊत यांना जामीन मिळाल्यामुळे शिवसेनेचे
पदाधिकारी, विरोधक भाजप तसेच शिंदे गटाला आक्रमक प्रत्युत्तर देण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
हा सत्याचा विजय असून संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आवाज आणखी बुलंद झाला आहे, असे नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी
सांगितले. संजय राऊत यांच्या समर्थनाच्या घोषणाही यावेळी त्यांनी दिल्या. माजी महानगरप्रमुख देवानंद बिरारी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.