DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

चंद्रकांत पाटलांची पुन्हा एकदा जाहीर दिलगिरी

वाद थांबवाण्याचे सर्वांना आवाहन

DD News Marathi by DD News Marathi
December 13, 2022
in महाराष्ट्र
0
चंद्रकांत पाटलांची पुन्हा एकदा जाहीर दिलगिरी

पुणे प्रतिनिधी :

दि. 13 डिसेंबर 2022

भाजप नेते व राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर त्याचे पडसाद राज्यभरात उमटले. त्यानंतर पाटील यांनी लगोलग दिलगीरी व्यक्त केली होती. मात्र, पाटील यांच्यावर पिंपरी-चिंचवड येथे शाईफेक झाल्याने राज्यभरात वातावरण तापले आहे. त्यानंतर पाटील यांनी पुन्हा एकदा दिलगीरी व्यक्त केली आहे.

पाटील यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रात म्हटले आहे. ”जय महाराष्ट्र! महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, बहुजन समाजाचे उध्दारक महात्मा ज्योतिबा फुले, प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पवित्र स्मृतीस आणि त्यांच्या अनुकरणीय कृतीस मी सदैव वंदन करत आलो आहे. माझ्या कृतीत मी नेहमीच त्यांचे अनुकरण केले आहे.”
”त्यांच्या महान कार्याविषयी मला मनापासून आदर आहे. त्यांच्याविषयी बोलताना माझ्याकडून बोली भाषेतील शब्द अनवधानाने निघाले, त्या शब्दांबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलीच आहे. यात मला कोणालाही दुखवायचा हेतू नव्हता पण त्यावरून घडलेल्या घटनांमुळे माझ्या मनाला क्लेश झाला आहे. शिवरायांच्या एका मावळ्यावर असे आरोप लावले जावेत याचे वाईट वाटत आहे. या मुद्द्यावरून महाराष्ट्र अशांत होऊ नये अशी माझी मनोमन इच्छा आहे.”

“ह्या विषयात कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी पुन्हा एकदा जाहिर माफी मागतो. माझी कोणाविषयीही तक्रार नाही. तसेच ज्या कोणाला कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे, त्यांची मुक्तता करावी. ज्या पोलिस अधिकाऱ्यांवर व पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे तीही मागे घ्यावी. तसेच जर पत्रकारांवर कारवाई करण्यात आली असेल तर तीही मागे घ्यावी, अशी सूचना करतो आहे.”

माझ्या तोंडावर ज्यांनी शाईफेक करणार्‍यांबद्दल मला काहीही म्हणायचे नाही. माझ्या दृष्टीने ह्या वादावर मी पडदा टाकला आहे. आता हा वाद थांबवावा ही विनंती, असेही पाटील म्हणाले.

 

बातमी नक्की शेअर करा
Tags: #BJP#ChandrakantPatil
Previous Post

मोरगाव ग्रामपंचायत निवडणुकीत श्री विघ्नहर्ता सर्वधर्म विकास पॅनल बाजी मारणार

Next Post

आज पुणे बंद. साडेसात हजार पोलिसांचा बंदोबस्त !

Next Post
आज पुणे बंद. साडेसात हजार पोलिसांचा बंदोबस्त !

आज पुणे बंद. साडेसात हजार पोलिसांचा बंदोबस्त !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा स्वतःच्या आमदारावर संताप!

फडणवीसांचा स्वतःच्या आमदारावर संताप!

December 10, 2025
“धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, नाहीतर राज्यव्यापी आंदोलन!”

“धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, नाहीतर राज्यव्यापी आंदोलन!”

December 10, 2025
जर्मन मेट्रोत सेलिब्रिटीच्या शेजारी बसला आणि नशीब फळफळले!

जर्मन मेट्रोत सेलिब्रिटीच्या शेजारी बसला आणि नशीब फळफळले!

December 10, 2025
महाराष्ट्रात EVM ची सुरक्षा पुरेशी वाटत नाही?

महाराष्ट्रात EVM ची सुरक्षा पुरेशी वाटत नाही?

December 10, 2025
बायकोचा फोन आला अन् तरुणाने आत्महत्त्या केली!

बायकोचा फोन आला अन् तरुणाने आत्महत्त्या केली!

December 9, 2025
नोकरी मिळणार या आशेने लग्न केलेल्या किरणची आत्महत्त्या!

नोकरी मिळणार या आशेने लग्न केलेल्या किरणची आत्महत्त्या!

December 9, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.