DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

मोरगाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या सरपंचपदाच्या तिरंगी लढतीत रोहिणी संदिप ढोले मारणार बाजी

ग्रामस्थांचा उत्साह आणि त्यांच्याशी चर्चेनुसार त्याच सरपंच होणार असे चित्र

DD News Marathi by DD News Marathi
December 14, 2022
in राजकीय
0
मोरगाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या सरपंचपदाच्या तिरंगी लढतीत रोहिणी संदिप ढोले मारणार बाजी

बारामती प्रतिनिधी :

दि. 14 डिसेंबर 2022

बारामती तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुका येत्या 18 डिसेंबर 2022 रोजी होऊ घातल्या आहेत. यात खासकरून मोरगावमधील निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. यामध्ये ‘श्री विघ्नहर्ता सर्वधर्म विकास पॅनल’चा दबदबा सर्वत्र दिसून येत आहे. इथे सरपंचपदासाठी तिरंगी लढत होते आहे. ‘श्री विघ्नहर्ता सर्वधर्म विकास पॅनल’च्या उच्चशिक्षित उमेदवार रोहिणी संदिप ढोले या सरपंचपदाच्या उमेदवार आहेत. त्यांचेबरोबर अलका पोपट तावरे आणि ललिता बाळकृष्ण तावरे या दोन प्रतिस्पर्धी आहेत.
गावात फेरफटका मारला असता रोहिणी संदिप ढोले यांनाच सरपंच म्हणून ग्रामस्थांची पसंती असल्याचे दिसले. त्यांच्या पॅनलचा लौकिक, त्यांच्या पॅनलने आत्तापर्यंत केलेली विकासकामे यांचा सकारात्मक परिणाम सर्वत्र आहे. स्वतः रोहिणी संदिप ढोले या उच्चशिक्षित आहेत. त्यामुळे त्यांची एक वेगळी प्रतिमा ग्रामस्थांमध्ये आहे. त्या प्रत्येक गोष्टीला विचारपूर्वक न्याय देऊ शकतील, शासनाच्या विविध योजना ग्रामस्थांपर्यंत परिणामकारकरित्या पोचविण्यात त्या यशस्वी होतील असा ग्रामस्थांना विश्वास आहे. गावाच्या विकासासाठीचे त्यांचे व्हीजन अतिशय विशाल आहे आणि त्यातील नमूद केलेली कामे पूर्ण करण्याची त्यांची क्षमता आहे असे ग्रामस्थांशी बोलताना समजले. तीर्थक्षेत्र मोरगाव हे ‘ब’ वर्गातून ‘अ’ वर्गात आणण्याचा त्यांचा निर्धारही त्या नक्की यशस्वी करतील असाही ग्रामस्थांना विश्वास आहे. सरपंच म्हणून आपल्या पदाचा त्या चांगल्या प्रकारे गावाच्या कल्याणासाठी उपयोग करतील अशी खात्री त्यांना आहे. या सर्व गोष्टींमुळे, तसेच दिवसेंदिवस ‘श्री विघ्नहर्ता सर्वधर्म विकास पॅनल’ला मिळणारा वाढता पाठिंबा पाहता या पॅनलच्या इतर अकरा उमेदवारांनाही भरघोस यश मिळेल असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. सरपंचपदाच्या तिरंगी लढतीत रोहिणी संदिप ढोले या खात्रीलायकरित्या विजयी होतील असा ठाम विश्वास ग्रामस्थांमध्ये पाहायला मिळतो.

 

बातमी नक्की शेअर करा
Tags: #Morgaon#MorgaonGramapanchaayat#RohiniSandipDhole
Previous Post

आज पुणे बंद. साडेसात हजार पोलिसांचा बंदोबस्त !

Next Post

सुषमा अंधारेंना ‘ते’ वक्तव्य भोवणार; वारकरी आक्रमक

Next Post
सुषमा अंधारेंना ‘ते’ वक्तव्य भोवणार; वारकरी आक्रमक

सुषमा अंधारेंना 'ते' वक्तव्य भोवणार; वारकरी आक्रमक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘नीट’मध्ये महाराष्ट्र अव्वल!!

‘नीट’मध्ये महाराष्ट्र अव्वल!!

June 16, 2025
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस विभागाच्या ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’चे लोकार्पण!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस विभागाच्या ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’चे लोकार्पण!

June 14, 2025
पुणे विभागातील कोविड-19 परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा!

पुणे विभागातील कोविड-19 परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा!

June 14, 2025
होस्टेलवर विमान कोसळलं पण ती वाचली! देव तारी त्याला कोण मारी?

होस्टेलवर विमान कोसळलं पण ती वाचली! देव तारी त्याला कोण मारी?

June 14, 2025
एक चूक अन् बापलेकीचा अंत!

एक चूक अन् बापलेकीचा अंत!

June 14, 2025
अहमदाबाद विमान अपघातातल्या मृतांचा आकडा २७४ वर!

अहमदाबाद विमान अपघातातल्या मृतांचा आकडा २७४ वर!

June 14, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.