बारामती प्रतिनिधी :
दि. 14 डिसेंबर 2022
येत्या 18 डिसेंबरला विविध ठिकाणी ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुका संपन्न होत आहेत. यात सर्वात जास्त उत्सुकता ताणली गेली आहे ती मोरगाव येथील निवडणुकीबद्दल. इथे सरपंचपदासाठी तिरंगी लढत होत आहे. श्री विघ्नहर्ता सर्वधर्म पॅनलच्या उच्चशिक्षित उमेदवार रोहिणी संदिप ढोले (कदम) तसेच इतर दोन पॅनलच्या अलका पोपट तावरे आणि ललिता बाळकृष्ण तावरे अश्या तीन उमेदवार सरपंचपदासाठी निवडणूक रिंगणात आहेत.
ग्रामस्थांशी चर्चा केली असता श्री विघ्नहर्ता सर्वधर्म पॅनललाच सर्वांची पसंती असल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यातच, सरपंचपदासाठी या पॅनलच्या उमेदवार असलेल्या रोहिणी संदिप ढोले (कदम) या उच्चशिक्षित असल्याने आमची त्यांनाच पसंती आहे असे सारे एकसुरात बोलत आहेत. शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोचविणे, शासनदरबारी विविध लोकोपयोगी गोष्टींसाठी पाठपुरावा करणे, त्यांची पूर्तता करणे या गोष्टी त्या सुशिक्षित असल्याने परिणामकारकरित्या करू शकतील असा विश्वास ग्रामस्थांना आहे असे दिसते. सर्वत्र याबाबतच चर्चा सुरू आहे. सरपंचपदासाठी सुशिक्षित उमेदवारालाच निवडून देण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. तसेच श्री विघ्नहर्ता सर्वधर्म पॅनल हेच गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणेल असा विश्वास ग्रामस्थांशी बोलताना जाणवला. तीर्थक्षेत्र मोरगावला ‘क’ वर्गातून ‘ब’ वर्गात आणण्यासाठी गेली २५ वर्षे पंचायत सदस्य असलेले याच पॅनलचे मा. सरपंच दत्तात्रय (आण्णा) ढोले यांचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळे आता त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली रोहिणी संदिप ढोले या मोरगाव तीर्थक्षेत्राला ‘अ’ वर्गात घेऊन येतील असे ग्रामस्थांचे ठाम म्हणणे आहे. त्यामुळे श्री विघ्नहर्ता सर्वधर्म पॅनललाच निवडून आणण्याचा ग्रामस्थांचा पक्का निर्धार दिसतो.