DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

कदमवाकवस्ती पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदी चित्तरंजन नाना गायकवाड यांचा विजय निश्चित

गावासाठी केलेली कामे देणार विक्रमी मते

DD News Marathi by DD News Marathi
December 15, 2022
in राजकीय
0
कदमवाकवस्ती पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदी चित्तरंजन नाना गायकवाड यांचा विजय निश्चित

हवेली प्रतिनिधी :
दि. १५ डिसेंबर २०२२

येत्या १८ डिसेंबरला विविध ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका संपन्न होत आहेत. कदमवाकवस्ती पंचवार्षिक सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीत यावेळी आगळाच उत्साह दिसून येत आहे. २०१७ ते २०२२ दरम्यान इथे ‘नवपरिवर्तन पॅनल’च्या गौरी चित्तरंजन (नाना) गायकवाड या सरपंच असताना गावाने लक्षणीय प्रगती केल्याचे ग्रामस्थ एकसुरात बोलतात. त्यांना चित्तरंजन नाना गायकवाड यांचे बहुमूल्य आणि अनुभवी मार्गदर्शन लाभले होते. आता याच पॅनलकडून स्वतः चित्तरंजन (नाना) त्रिंबक गायकवाड हे सरपंचपदासाठी निवडणूक लढवित आहेत. ग्रामस्थांशी आम्ही संवाद साधला असता, या निवडणुकीत गौरीताई चित्तरंजन गायकवाड यांनी केलेली भरघोस विकासकामे, नवपरिवर्तन पॅनलकडे विजयश्री खेचून आणणार असल्याचे ग्रामस्थ ठामपणे सांगतात. बहुचर्चित आणि कदमवाकवस्तीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी तब्बल ९० कोटींची पाणीपुरवठा योजना गौरीताईंनी यशस्वीपणे मंजूर करून घेतली आहे. इतकेच नव्हे तर तिचे कामही आता सुरू झाले आहे असे ग्रामस्थ सांगतात. गावाची अशी आपलेपणाने काळजी घेणार्‍या, ग्रामस्थांना जास्तीत जास्त सुखसोयी प्रदान करणार्‍या नवपरिवर्तन पॅनलच्या चित्तरंजन (नाना) गायकवाड यांना आणि त्यांच्या पॅनलला निवडून देणे आमचे कर्तव्य आहे असे बहुतांशी ग्रामस्थांनी एकसुरात संगितले.
या सर्व चर्चेतून आणि ग्रामस्थांची कृतज्ञतेची भावना लक्षात घेता येत्या कदमवाकवस्ती पंचवार्षिक सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच म्हणून चित्तरंजन त्रिंबक गायकवाड आणि त्यांचे ‘नवपरिवर्तन पॅनल’ यांचा विजय निश्चित असल्याचेच चित्र सर्वत्र आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #ChittaranjanGaikwad#GramapanchayatElections2022-2023#kadamvakvasti
Previous Post

आव्हाळवाडी सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीत काकासाहेब रामराव सातव आणि त्यांच्या सहकार्‍यांचा बोलबाला

Next Post

पेरणे गावाच्या ग्रामपंचायत सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीत सरपंचपदासाठी उषाताई दशरथ वाळके यांना वाढता पाठिंबा

Next Post
पेरणे गावाच्या ग्रामपंचायत सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीत सरपंचपदासाठी उषाताई दशरथ वाळके यांना वाढता पाठिंबा

पेरणे गावाच्या ग्रामपंचायत सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीत सरपंचपदासाठी उषाताई दशरथ वाळके यांना वाढता पाठिंबा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.