हवेली प्रतिनिधी :
दि. 15 डिसेंबर 2022
पेरणे गावात येत्या ग्रामपंचायत सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीत सरपंचपदासाठी उषाताई दशरथ वाळके या श्री सिद्धेश्वर पाचपीर महाराज ग्रामविकास पॅनलतर्फे निवडणूक लढवित आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने ग्रामस्थांशी संवाद साधला असता त्यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली.
त्यांच्या मते सरपंचपदाच्या उमेदवार उषाताई दशरथ वाळके या सरपंच म्हणून अतिशय परिणामकारक कामगिरी करतील. “उद्देश चांगला तर यश निश्चित” असे उषाताईंचे अभिमानाने सांगणे असते असे ग्रामस्थ म्हणाले.
त्यांच्या श्री सिद्धेश्वर पाचपीर महाराज ग्रामविकास पॅनलने आत्तापर्यंत गावासाठी मोलाची कामगिरी केली आहे. सरपंच रूपेश चंद्रकांत ठोंबरे यांनी 2017 ते 2022 या काळात गावासाठी अतिशय भरीव कामगिरी केली आहे. स्ट्रीट लाईट्स, गटारांची कामे, विविध ठिकाणांचे सुशोभीकरण, रस्त्यांचे डांबरीकरण, कॉंक्रीटीकरण इ. सर्वसमावेशक कामे श्री सिद्धेश्वर पाचपीर महाराज ग्रामविकास पॅनलच्या माध्यमातून आजपर्यंत झाली आहेत याचा उल्लेख ग्रामस्थ अतिशय कृतज्ञतेने करताना दिसले.
गावाच्या आणि ग्रामस्थांच्या भल्यासाठी जे जे म्हणून करता येईल ते ते सर्व या पॅनलने सरपंच रूपेश ठोंबरे यांच्या नेतृत्त्वात आजपर्यंत केले आहे असे जो तो मनापासून सांगताना दिसतो. त्यांच्याच मार्गदर्शनातून आता उषाताई सरपंच म्हणून निवडणूक लढवित असल्याने त्यांनाच निवडून देण्याचा ग्रामस्थांचा निर्धार आहे. उषाताईंच्या सरपंचपदी विराजमान होण्याने आणि श्री सिद्धेश्वर पाचपीर महाराज ग्रामविकास पॅनल पुन्हा सत्तेत येण्याने पेरणे गावाचा विकास अधिक जोमाने आणि अखंडपणे चालू राहील असा ग्रामस्थांना विश्वास आहे.