DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

मोरगाव ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत रोहिणी संदिप ढोले (कदम) विजयी होण्याची चिन्हे

श्री विघ्नहर्ता सर्वधर्म पॅनलचा सर्वत्र दबदबा

DD News Marathi by DD News Marathi
December 17, 2022
in राजकीय
0
मोरगाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या तिरंगी लढतीत रोहिणी संदिप ढोले (कदम) मारणार बाजी

बारामती प्रतिनिधी :
दि. 17 डिसेंबर 2022

येत्या 18 डिसेंबरला विविध ठिकाणी संपन्न होणार्‍या ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकांचे मतदान उद्या होणार आहे. या पार्श्वभूमीवर मोरगाव येथील परिस्थितीचा अंदाज घेतला असता सरपंचपदाच्या तिरंगी लढतीत रोहिणी संदिप ढोले (कदम) या बाजी मारणार असे दिसते आहे. गावाचा एकंदरीत सूर पाहाता त्यांच्या श्री विघ्नहर्ता सर्वधर्म पॅनलचा सर्वत्र दबदबा असल्याचे चित्र समोर आले.
इथे सरपंचपदासाठी तिरंगी लढत होत असली तरी श्री विघ्नहर्ता सर्वधर्म पॅनलच्या उच्चशिक्षित उमेदवार रोहिणी संदिप ढोले (कदम) यांना बहुसंख्य ग्रामस्थांची पसंती असल्याचे दिसले. मुळात ग्रामस्थांना सुशिक्षित व्यक्तीने सरपंचपदी विराजमान व्हावे असे वाटते आहे. असेही समजले की ग्रामस्थांच्या आग्रहाखातरच रोहिणी संदिप ढोले (कदम) या निवडणुकीत सामील झाल्या आहेत. हा मुद्दा जर ग्राह्य मानला तर त्यांचा विजय आत्ताच निश्चित झाला आहे असे म्हणावे लागेल. शिवाय त्या उच्चशिक्षित असल्याने त्यांचा एक वेगळाच पगडा जनमानसावर आहे. ग्रामस्थांशी चर्चा केली असता श्री विघ्नहर्ता सर्वधर्म पॅनललाच सर्वांची पसंती असल्याचे चित्र पाहायला मिळाले. लोककल्याणाची विविध कामे त्या सकारात्मकतेने आणि परिणामकारकपणे मार्गी लावतील असा ग्रामस्थांना विश्वास आहे. शासन आणि जनता यांच्यातील महत्त्वाचा आणि विधायक दुवा त्या ठरतील असे ग्रामस्थ बोलताना दिसले. ग्रामस्थांनी सरपंचपदासाठी सुशिक्षित उमेदवारालाच निवडून देण्याचा निर्धार केला आहे. तसेच श्री विघ्नहर्ता सर्वधर्म पॅनलचा, लोककल्याण करणारे पॅनल, असा ग्रामस्थांवर पगडा आहे. गेली २५ वर्षे पंचायत सदस्य असलेले याच पॅनलचे मा. सरपंच दत्तात्रय (आण्णा) ढोले यांचा तीर्थक्षेत्र मोरगावला ‘क’ वर्गातून ‘ब’ वर्गात आणण्यात सिंहाचा वाटा होता. त्यामुळे आता त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून, काम करणार्‍या रोहिणी संदिप ढोले (कदम) या मोरगाव तीर्थक्षेत्राला ‘अ’ वर्गात नक्कीच घेऊन येतील असा ग्रामस्थांना विश्वास आहे. त्यामुळे मोरगाव ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत रोहिणी संदिप ढोले (कदम) विजयी होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #MorgaonGramapanchaayat#morgaonGrampanchayatElections
Previous Post

पाणीपुरवठा योजना कदमवाकवस्तीत आणण्यासाठी जनसेवा पॅनलप्रमुखाने मागितली 40 कोटींची लाच?

Next Post

आव्हाळवाडी सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीत काकासाहेब रामराव सातव आणि सहकारी मारणार बाजी

Next Post
आव्हाळवाडी सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीत काकासाहेब रामराव सातव आणि त्यांच्या सहकार्‍यांचा बोलबाला

आव्हाळवाडी सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीत काकासाहेब रामराव सातव आणि सहकारी मारणार बाजी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्मशानभूमीतून बाहेर पडली ‘आनंदलेली’ भुतं!

स्मशानभूमीतून बाहेर पडली ‘आनंदलेली’ भुतं!

August 2, 2025
‘श्यामची आई’ सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार!

‘श्यामची आई’ सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार!

August 2, 2025
मिठी नदी प्रकरणी ६५ कोटी रुपयांचा घोटाळा!

मिठी नदी प्रकरणी ६५ कोटी रुपयांचा घोटाळा!

August 2, 2025
इंडिगो विमानात एका पीडित व्यक्तीस सहप्रवाशाने कानशिलात लगावली!

इंडिगो विमानात एका पीडित व्यक्तीस सहप्रवाशाने कानशिलात लगावली!

August 2, 2025
उच्चशिक्षित महिला! आठ पुरुषांसोबत लग्न!

उच्चशिक्षित महिला! आठ पुरुषांसोबत लग्न!

August 2, 2025
पुण्यातील यवतमधील वातावरण निवळते आहे!

पुण्यातील यवतमधील वातावरण निवळते आहे!

August 2, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.