DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

पुणे जिल्हा ग्रामसेवक युनियन DNE 136 व सहकारी संघटना पुरस्कृत, ‘प्रगती पॅनल’च्या प्रचाराचा भव्य शुभारंभ

पुणे जिल्हा ग्रामसेवक पतसंस्था सार्वत्रिक निवडणूक 2022-2027 येत्या 14 जानेवारीला

DD News Marathi by DD News Marathi
January 9, 2023
in राजकीय
0
पुणे जिल्हा ग्रामसेवक युनियन DNE 136 व सहकारी संघटना पुरस्कृत, ‘प्रगती पॅनल’च्या प्रचाराचा भव्य शुभारंभ

पुणे प्रतिनिधी :

दि. 7 जानेवारी 2023

पुणे जिल्हा ग्रामसेवक पतसंस्था सार्वत्रिक निवडणूक 2022-2027 अंतर्गत, पुणे जिल्हा ग्रामसेवक युनियन DNE 136 व सहकारी संघटना पुरस्कृत, ‘प्रगती पॅनल’च्या प्रचाराचा भव्य शुभारंभ शुक्रवार दि. 6 जानेवारी रोजी मोठ्या दिमाखात संपन्न झाला. प्रचाराचा हा शुभारंभ दुपारी 2 वाजता, पुणे-सोलापूर रोडवरील थेऊर फाटा येथील, एस 4 जी हॉटेल शेजारील जिजाऊ गार्डन येथे संपन्न झाला. प्रचंड संख्येने सभासद या समारोहास उपस्थित होते. सर्व उमेदवारांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. पॅनलचे व्हीजन (वचननामा) यावेळी मुद्देसूदपणे मांडण्यात आले. ‘महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचा विजय असो’, ‘प्रगती पॅनलचा विजय असो’ या घोषणांनी सभागृह दणाणून सोडले.
पुणे जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेची सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक 2022 ते 2027 येत्या शनिवार दिनांक 14 जानेवारी 2023 रोजी संपन्न होत आहे. पुणे जिल्हा ग्रामसेवक युनियन DNE 136 व सहकारी संघटना पुरस्कृत या निवडणुकीत ‘प्रगती पॅनलचे’ 13 उमेदवार सर्वसाधारण गटातून आणि 5 उमेदवार राखीव प्रवर्गातून निवडणूक लढवित आहेत. या सर्व उमेदवारांचे चिन्ह कपबशी आहे.
‘प्रगती पॅनल’ने जे व्हिजन पतसंस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी आणि भरभराटीसाठी ठेवले आहे ते या प्रचार शुभारंभ समारोहात जाहीर केले गेले. अतिशय दूरदृष्टीने आखलेले हे व्हीजन आहे असे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या घटना कमिटीचे अध्यक्ष श्री, अनिल कुंभार यांनी यावेळी सांगितले. ठरवलेली प्रत्येक गोष्ट पूर्ण करणारे आणि प्रत्येक संकल्प सिद्धीस नेणारे अशी ‘प्रगती पॅनल’ची ख्याती आहे असे उपस्थितांशी बोलताना जाणवले. 2022 ते 2027 या पंचवार्षिक कार्यकाळात ‘प्रगती पॅनल’ पुणे जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेला वेगाने प्रगतिपथावर घेऊन जाण्यास सज्ज झाले आहे असे सर्व उमेदवारांनी एकसुरात संगितले. त्यांचं व्हिजन हे सर्वसमावेशक आणि सर्वांगीण प्रगती साधणारं आहे असं ‘प्रगती पॅनल’चं म्हणणं आहे.
त्यांच्या व्हीजनमधील ठळक मुद्दे म्हणजे, कर्जमर्यादा पुढील २ वर्षांत १० लक्ष वरुन १५ लक्ष रु. केली जाईल. सभासदांच्या मुलीच्या लग्नासाठी ‘कन्यादान योजना’ राबवून मुलीच्या विवाहासाठी या योजनेअंतर्गत आकस्मिक कर्ज उपलब्ध करुन दिले जाईल. पतसंस्थेसाठी जागेची मध्यवर्ती ठिकाणी खरेदी करुन त्यावर इमारत बांधली जाईल. सभासदांच्या पाल्यांना ‘उच्च शिक्षणासाठी रु. ५ लक्ष एवढे शैक्षणिक कर्ज उपलब्ध करुन देणार. संस्थेच्या मालमत्तांचे योग्य नियोजन करुन मालमत्ता अबाधित ठेवून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणार. अश्या महत्त्वाच्या तरतूदींबरोबरच पतसंस्थेच्या आणि सभासदांच्या दृष्टीने इतर बर्‍याच कल्याणकारी योजना या व्हीजनमध्ये ‘प्रगती पॅनल’ने जाहीर केल्या आहेत.
असा सर्वसमावेशक, पतसंस्थेच्या प्रगतीला पोषक आणि सभासदांना हितावाह असा कारभार करण्याचे वचन देणार्‍या प्रगती पॅनलला प्रचंड बहुमताने विजयी करा आणि भरभराटीची द्वारे खुली करा असे आवाहन या प्रचार शुभारंभादरम्यान करण्यात आले.

या सभेकरिता ग्रामसेवक युनियन चे अध्यक्ष , पतसंस्थेचे सरचिटणीस व युनियन चे आजी-माजी पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, सचिव व सभासद मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

 

 

 

बातमी नक्की शेअर करा
Tags: #patasanstha#punejilhagramasevaksahakaripatasanstha#theur
Previous Post

अखेर ‘पठान’ चित्रपट अडकला सेन्सॉरच्या कचाट्यात

Next Post

पुणे जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘प्रगती पॅनल’चा बोलबाला.

Next Post
पुणे जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘प्रगती पॅनल’चा बोलबाला.

पुणे जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत 'प्रगती पॅनल'चा बोलबाला.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.