पुणे प्रतिनिधी :
दि. २४ एप्रिल २०२३
येत्या २८ एप्रिल २०२३ रोजी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका तब्बल १९ वर्षांनंतर होत आहेत. या १९ वर्षांत प्रशासकीय कारभार होता. त्यामुळे आता त्यात बदल होणार असल्याने या निवडणुकीबाबत कमालीची उत्सुकता अनुभवायला मिळते आहे. साहजिकच आम्ही विविध मतदारांशी संपर्क साधून त्यांचे मनोगत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. विलास दत्तात्रय भुजबळ व अमोल मुरलीधर घुले हे व्यापार विकास पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढवित आहेत. या दोघांबद्दलही अतिशय सकारात्मक मते या भेटीदरम्यान ऐकायला मिळाली. ते म्हणाले या १९ वर्षांच्या काळात निर्माण झालेल्या ज्या त्रुटी, समस्या व्यापारी व आडते यांना भेडसावत आहेत त्यांना समूळ नष्ट करण्यासाठी हे दोघेही सक्षम आहेत आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे असा बदल घडवून आणण्याची त्यांची वृत्ती आहे.
या मतदारांनी पुढे संगितले की विलास दत्तात्रय भुजबळ हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राहिलेले आहेत आणि त्यांनी आडते असोसिएशनचे अध्यक्ष म्हणूनही अतिशय उत्तम प्रकारे काम केलेले आहे. हा त्यांचा अनुभव आणि त्यांच्या कामाबद्दल आम्हाला असलेली कल्पना यामुळे दुसर्या कुणाला मत देण्याचा विषयच उरत नाही.
श्री. अमोल मुरलीधर घुले हे मुरलीधर पंढरीनाथ घुले अर्थात एम. पी. घुले म्हणून सुपरिचित असलेल्या व्यक्तिमत्त्वाचे चिरंजीव आहेत. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकूनच ते मार्गक्रमण करीत आहेत याचीही मतदारांना विशेष जाणीव आहे. आडते असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून काम केलेले, तत्कालीन अध्यक्ष व ज्येष्ठ मार्गदर्शक श्री.विलासशेठ भुजबळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभलेले अमोल मुरलीधर घुले यांना, आडते व्यापारी, विक्रेते, शेतकरी व खरेदीदार व्यापारी ह्यांच्या विविध समस्या सोडविण्याचा चांगलाच अनुभव आहे.
या दोन्ही उमेदवारांची लोकांमध्ये असलेली प्रतिमा आणि त्यांची एकंदरीत पार्श्वभूमी लक्षात घेता छोटे व्यापारी व आडते यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी व्यापार विकास पॅनललाच निवडून देणं अतिशय आवश्यक आहे असे बहुतांशी लोकांचे म्हणणे आहे.
लोककल्याणाची क्षमता आणि अधिकार एकदा निवडून आल्यावर येतातच, पण तसं करण्याची वृत्ती मुळात अंगी असणं हे मात्र अतिशय आवश्यक असतं. या दोन्ही गोष्टींचा सुवर्णयोग व्यापार विकास पॅनलच्या विलास दत्तात्रय भुजबळ आणि अमोल मुरलीधर घुले यांच्या रूपाने जुळून येईल अशीच मतदारांची भावना आहे आणि हीच भावना व्यापार विकास पॅनलला सहजगत्या विजय मिळवून देईल असे वाटते.