पुणे प्रतिनिधी :
दि. २५ एप्रिल २०२३
कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक येत्या २८ एप्रिल रोजी संपन्न होत आहे. यात अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समिती. हमाल मापाडी मतदार संघातून राजेंद्र ज्ञानोबा चोरघे हे निवडणूक लढवित आहेत. यानिमित्त आज मार्केट परिसरात फेरफटका मारून कष्टकरी, हमाल, मापाडी यांच्याशी संवाद साधला असता राजेंद्र चोरघे यांना त्यांचा भरभक्कम पाठिंबा असल्याचे दिसून आले.
डॉ. बाबा आढाव यांचे विशेष प्रयत्न आणि सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून, राजेंद्र चोरघे यांनी या वर्गासाठी एक क्रांतिकारी कायदा संमत करून घेतला आहे असे काही लोकांशी बोलताना समजले. यानुसार कष्टकरी कामगार, तोलणार वर्गातील एक प्रतिनिधी, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदी निवडून जाईल हा महत्त्वपूर्ण निर्णय संमत झाला. यामुळे आमचा आवाज आता दाबला जाणार नाही, उलट तो बुलंद होईल असे एका कष्टकरी मतदाराने भारावून संगितले. राजेंद्र चोरघे हे बाबांच्या आचार विचारांत वाढलेले आहेत अशी या कष्टकरी कामगार, तोलणार वर्गातील लोकांची भावना आहे आणि खुद्द बाबांनीच ठामपणे चोरघे यांना पाठिंबा देऊन या वर्गाचा प्रतिनिधी म्हणून निवडलेले असल्याने आम्ही दुसर्या कुणाचा विचारही करणार नाही असे लोकांनी ठणकावून सांगितले.
यात भर म्हणून राजेंद्र चोरघे यांच्या आत्तापर्यंत केलेल्या कामांना हा वर्ग कृतज्ञतेने स्मरतो. या कामांबद्दल अधिक माहिती विचारली असता ते म्हणाले, माथाडी मंडळाच्या हिशोबाची मागणी चोरघे यांनी संघटनेच्या माध्यमातून केली. कोट्यावधी रुपयांच्या शिल्लक तोलाईचे वाटप केवळ राजेंद्र चोरघे यांच्या प्रयत्नांतूनच झाले. त्यांनी तोलणार कामगारांसाठी अनुकंपा सुरू केला. माथाडी कामगारांना रु. ५० हजारांची तातडीची वैद्यकीय मदत त्यांनीच सुरू केली. संघटनेला विश्वासात घेतल्याशिवाय एकही तोलणार भरती करू दिला नाही. शिवाय त्यांनी, माथाडी कामगाराने राजीनामा देताना त्याची नोंद आहे तोपर्यंत त्याला संपूर्ण रकमेवर व्याज मिळावे यासाठी पाठपुरावा केला आणि हे व्याज सुरूदेखील केले.
विविध कामगार, कष्टकरी, तोलणार यांच्याशी बोलून मिळालेल्या वरील माहितीच्या आधारे आणि परिसरातील एकूण वातावरण पाहाता राजेंद्र ज्ञानोबा चोरघे हेच अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समिती. हमाल मापाडी मतदार संघातून येत्या २८ तारखेला निवडून येतील असे वाटते.