पुणे, दि. २५ एप्रिल २०२३ :
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक सध्या चुरशीची होत चालली आहे. अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीने आखलेल्या सर्व नियोजनावर राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनलच्या प्रभावी प्रचारामुळे पाणी फिरल्याचे दिसून येत आहे. तेव्हा, सध्यातरी नेतेमंडळींच्या सक्रिय सहभागामुळे अण्णासाहेब मगर सहकार पॅनल सरस ठरत असल्याचे दिसून येत आहे.
अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीने जवळपास एक वर्षापासून बाजार समितीच्या निवडणुकीची जोरदार तयारी केली होती. अण्णासाहेब मगर सहकार पॅनलचे उमेदवार जाहीर होईपर्यंत आम्हीच निवडून येणार असं छातीठोकपणे सांगणारे अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीचे नेते गलितगात्र झाल्याचे दिसत आहेत. त्याचे कारण, राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनलने हवेली तालुक्यातील उमेदवार समतोल साधून दिले आहेत. तसेच हवेली तालुका हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पूर्वीपासून बालेकिल्ला राहिला आहे. काहींनी वैयक्तिक स्वार्थापोटी या निवडणुकीत वेगळी चूल जरी मांडली असली तरी त्यांचा किती निभाव लागेल हे सांगणं सध्यातरी कठिण आहे.
या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. शरद पवार व अजित पवार यांच्या जिल्ह्यातील सहकाराच्या निवडणुकीत राष्ट्रवादी मागे हटणार नाही, हेच या निवडणुकीवरुन दिसून येतंय. पूर्व हवेली तालुक्यात आमदार अशोक बापू पवार यांनी कंबर कसली आहे. आमदार चेतन तुपे, आमदार सुनिल टिंगरे, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे, सुरेश घुले, प्रकाश म्हस्के, माणिक गोते, माधव काळभोर, माणिकराव सातव, राजेंद्र खांदवे, सोपान कांचन, अमित कांचन, अनिल टिळेकर, तात्यासाहेब काळे,हिरामण काकडे, सोनबा चौधरी,डॉ.शिवदिप उंद्रे, नंदु काळभोर, अप्पासाहेब काळभोर, रामदास चौधरी, प्रविण कामठे, सनी काळभोर, गुलाब चौधरी, अंकुश घुले, प्रदिप कंद, अशोक मोरे, तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर व भारती शेवाळे,सुरेखा भोरडे आदींनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे.
तसेच पश्चिम हवेलीत माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, माजी नगरसेवक दिपक मानकर, दिलीप बराटे, बाबुराव चांदेरे, सचिन दोडके,विशाल तांबे, काकासाहेब चव्हाण, हर्षदा वांजळे, बाळा धनकवडे, बाबासाहेब धुमाळ, सुनिल चांदेरे, सायली वांजळे, पूजा पारगे,अनिता इंगळे,बाळासाहेब पारगे, प्रविण शिंदे, तालुकाध्यक्ष त्रिंबक मोकाशी, सुधाकर गायकवाड यांच्यासह पक्षाचे आजी माजी लोकप्रतिनिधी, इतर पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्ते जोरदार कामाला लागले आहेत. तसेच पुरंदर हवेली मतदारसंघात समाविष्ट हवेली तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह तालुकाध्यक्ष भरत झांबरे यांनी परिसर पिंजून काढला आहे.
सर्व भागातील राष्ट्रवादीतील नेतेमंडळी व पदाधिकारी प्रभावीपणे काम करीत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनल सध्या सरस ठरत असल्याचे दिसून येत आहे. तसेच अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी काही तंबूंवर आधारलेली असून त्यांच्यात एकवाक्यता नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनल पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची सत्ता काबीज करेल अशी मतदारांमध्ये चर्चा आहे.