DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

श्री.शहानशहावली ग्रामविकास पॅनल व आनंदा पवार यांचा दणदणीत विजय निश्चित!

कोलवडी साष्टे निवडणुक रंगतदार

DD News Marathi by DD News Marathi
October 19, 2023
in ताज्या बातम्या
0
श्री.शहानशहावली ग्रामविकास पॅनल व आनंदा पवार यांचा दणदणीत विजय निश्चित!

हवेली प्रतिनिधी / डीडी न्युज मराठी
दि.१४ ऑक्टोंबर २०२३

कोलवडी साष्टे गावाची पंचवार्षिक निवडणुक येत्या ५ नोव्हेंबर रोजी संपन्न होत आहे. श्री.शहानशहावली ग्रामविकास पॅनल व श्री.शहानशहावली परिवर्तन पॅनल हे दोन्ही पॅनल समोरसमोर उभे राहिले आहेत. या दोन्ही पॅनलतर्फे अनुक्रमे आनंदा पवार व विनायक गायकवाड या दोघांत सरपंच पदासाठी प्रमुख लढत आहे. त्यानुसार सत्ताधारी श्री.शहानशहावली ग्रामविकास पॅनल व आनंदा पवार यांचा दणदणीत विजय निश्चित असल्याचं दिसून येत आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत आनंदा पवार यांना जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. कोलवडी साष्टे गावाच्या निवडणुकीकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

दोन्ही पॅनलचे वॅार्डमधील जवळपास सर्वच उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. काही वॅार्डमधील उमेदवारांची फक्त नाव जाहीर करणे बाकी आहे. त्यामुळे या दोन्ही पॅनलच्या लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. सरपंच पदाचे उमेदवार आनंदा पवार लढत असलेला श्री.शहानशहावली ग्रामविकास पॅनल हा गेल्या दोन निवडणुकांमध्ये सत्ताधारी पॅनल आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत या पॅनलने लोकनियुक्त सरपंचासह १३ पैकी ११ जागा जिंकत विरोधकांना हाबडा दिला होता. यावेळीही ग्रामविकास पॅनलच्या विरोधात कोण आणि कसं निवडणुक लढणार हा मोठा प्रश्न विरोधकांसमोर होता. मात्र, विरोधक परिवर्तन पॅनलने ग्रामविकास पॅनलमधील काहींना फोडून आपल्याकडे वळवून आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, दोन्ही पॅनल आणि उमेदवार जाहीर झाल्यानंतर सरपंच पदाचे उमेदवार आनंदा पवार लढत असलेला श्री.शहानशहावली ग्रामविकास पॅनल हा तगडा पॅनल असल्याचे दिसून येत आहे.

कोलवडी साष्टे गावात एकुण सात हजार दोनशे मतदार आहेत. गावात निवडणुकीसाठी ५ वॅार्ड असून त्यातून १३ उमेदवार निवडले जाणार आहेत. तसेच थेट जनतेतून लोकनियुक्त सरपंच पदाचा उमेदवार निवडला जाणार आहे. मात्र, श्री.शहानशहावली ग्रामविकास पॅनलचीच प्रत्येक वॅार्डमध्ये हवा असल्याचे दिसत आहे.

श्री.शहानशहावली ग्रामविकास पॅनलने गेल्या पाच वर्षामध्ये गावात अतिशय चांगल्या पद्धतीने विकासकामे केली आहेत. त्यामुळे या पॅनलवर जनतेचा पुन्हा विश्वास असल्याचं दिसून येत आहे. आनंदा पवार यांनी उपसरपंच व महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे सलग पाच वर्ष अध्यक्ष म्हणून गावात अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं आहे. आनंदा पवार यांनी पाच वर्षात तेराशेहून अधिक तंटे सोडविले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने समितीचा पारितोषिक देऊन गौरव केला आहे. त्यामुळे आनंदा पवार यांची तंटामुक्ती मॅन ओळख झाली आहे. शुन्यातून सुरुवात करुन समाजसेवक व उद्योजक म्हणून पवार यांनी स्वतःती ओळख केली आहे. प्रत्येकाला सोबत घेऊन आणि विनम्रपणे सर्वांशी संबंध असलेले अनुभवी व अभ्यासू लोकसेवक आनंदा पवार यांनी सध्यातरी आघाडी घेतल्याचे स्पष्ट दिसत आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #grampanchayat #grampanchayatelection #kolwadi #sasthe #generalelection2023 #gramvikaspanel #abakibar #anandapawar
Previous Post

पुणे कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदासाठी मतदान सुरू

Next Post

रांजणगाव ग्रामपंचायत निवडणुकीत मानसिंग पाचुदंकर मुख्य भूमिकेत

Next Post
रांजणगाव ग्रामपंचायत निवडणुकीत मानसिंग पाचुदंकर मुख्य भूमिकेत

रांजणगाव ग्रामपंचायत निवडणुकीत मानसिंग पाचुदंकर मुख्य भूमिकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

October 17, 2025
राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

October 17, 2025
‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

October 17, 2025
कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

October 16, 2025
प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

October 16, 2025
मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

October 16, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.