DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

अफगाणिस्तानचा ऐतिहासिक विजय; चेन्नईत पाकिस्तानचा गेम झाला

आधी फिरकीवर नाचवले अन् मग गोलंदाजांना धुतले

DD News Marathi by DD News Marathi
October 23, 2023
in क्रीडा
0
अफगाणिस्तानचा ऐतिहासिक विजय; चेन्नईत पाकिस्तानचा गेम झाला

चेन्नई प्रतिनिधी : डीडी न्यूज मराठी 

दि.23 ऑक्टोबर 2023 

भारतात सुरू असलेल्या आयसीसी वनडे वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तान संघाने आणखी एक धक्कादायक विजयाची नोंद केली. चेन्नईतील चेपॉक मैदानावर झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानवर ८ विकेटनी विजय मिळवला. याआधी अफगाणिस्तानने इंग्लंडविरुद्ध ६९ धावांनी विजय मिळून खळबळ उडवली होती. तेव्हा तो स्पर्धेतील पहिला धक्कादायक निकाल ठरला होता. त्यानंतर अफगाण संघाने आणखी एक धक्कादायक विजयाची नोंद केली. वनडे क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानने पाकिस्तानवर मिळवलेला हा पहिलाच विजय आहे. याआधी दोन्ही संघात ७ लढती झाल्या होत्या आणि त्या सर्व पाकिस्तानने जिंकल्या होत्या.

प्रथम फलंदाजीकरत पाकिस्तानने अफगाणिस्तानसमोर २८३ धावांचे लक्ष्य दिले होते. पाकिस्तानच्या गोलंदाजीसमोर आणि अफगाणिस्तानचा अनुभव लक्षात घेता ही धावसंख्या आव्हानात्मक होती. पण अफगाणिस्तानचे सलामीवीर तयारीत आले होते. रहमानउल्ला गुरबाज आणि इब्राहिम झारदान यांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागिदार करून विजयाचा पाया तयार केला. २२व्या षटकात गुरबाज बाद झाला. त्याने ५३ चेंडूत १ षटकार आणि ९ चौकारांसह ६५ धावा केल्या. गुरबाज आणि झारदान यांनी पहिल्या विकेटसाठई १३० धावांची भागिदारी केली. त्यानंतर आलेल्या रहमत शाह यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६० धावा जोडल्या. झारदान शतक पूर्ण करेल असे वाटत असताना तो ८७ धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने शाहसोबत नाबाद भागिदारीकरून देशाला ऐतिहासिक असा विजय मिळून दिला.

बातमी नक्की शेअर करा
Previous Post

रांजणगाव ग्रामपंचायत निवडणुकीत मानसिंग पाचुदंकर मुख्य भूमिकेत

Next Post

श्री.शहानशहावली ग्रामविकास पॅनलच्या प्रचाराचा धुमधडाक्यात शुभारंभ.

Next Post
श्री.शहानशहावली ग्रामविकास पॅनलच्या प्रचाराचा धुमधडाक्यात शुभारंभ.

श्री.शहानशहावली ग्रामविकास पॅनलच्या प्रचाराचा धुमधडाक्यात शुभारंभ.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्मशानभूमीतून बाहेर पडली ‘आनंदलेली’ भुतं!

स्मशानभूमीतून बाहेर पडली ‘आनंदलेली’ भुतं!

August 2, 2025
‘श्यामची आई’ सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार!

‘श्यामची आई’ सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार!

August 2, 2025
मिठी नदी प्रकरणी ६५ कोटी रुपयांचा घोटाळा!

मिठी नदी प्रकरणी ६५ कोटी रुपयांचा घोटाळा!

August 2, 2025
इंडिगो विमानात एका पीडित व्यक्तीस सहप्रवाशाने कानशिलात लगावली!

इंडिगो विमानात एका पीडित व्यक्तीस सहप्रवाशाने कानशिलात लगावली!

August 2, 2025
उच्चशिक्षित महिला! आठ पुरुषांसोबत लग्न!

उच्चशिक्षित महिला! आठ पुरुषांसोबत लग्न!

August 2, 2025
पुण्यातील यवतमधील वातावरण निवळते आहे!

पुण्यातील यवतमधील वातावरण निवळते आहे!

August 2, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.