DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

इकडे धंगेकरांची लोकसभेची तयारी, तिकडे शिवसेना ठाकरे गटाची वेगळीच मागणी?

कसबा पोटनिवडणुकीच्यावेळी महाविकास आघाडीत असलेली एकी या लोकसभेला टिकणार का?

DD News Marathi by DD News Marathi
March 29, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0

पुणे प्रतिनिधी :
दि. २९ मार्च २०२४

कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांचा तब्बल ११००० मतांनी विजय झाला होता. त्यापूर्वी २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे विशाल धनवडे हे देखील बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढले असताना त्यांनी तब्बल १६००० मते मिळविली होती.

आता असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे नेते विशाल धनवडे यांनी केला आहे की हीच मते कसबा पोटनिवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकर यांना मिळाली आणि त्यांचा विजय झाला. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये कसबा विधानसभेची ही जागा शिवसेना ठाकरे गटाला मिळावी. त्याबरोबरच आपण निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं विशाल धनवडेंनी सांगितलं आहे.

कसबा पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसला रवींद्र धंगेकर यांच्या रूपाने विजयश्री मिळाली होती. महाविकास आघाडीतील एकत्रित प्रयत्नांमुळे धंगेकरांनी हा विजय खेचून आणला. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये असाच चमत्कार होऊन धंगेकर पुण्याचे खासदार होतील, असं महाविकास आघाडीचं भाकीत आहे.

पुन्हा एकदा धंगेकरांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचं हेच कारण समोर आलं आहे . मात्र, कसबा पोटनिवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडीत असलेली एकी या लोकसभेला टिकणार का? याबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. कारण निवडणूक प्रचाराच्या पहिल्या टप्प्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये धुसफूस सुरू झाल्याची चिन्हे दिसत आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या नियोजनासाठी काँग्रेस भवन येथे महाविकास आघाडीतील नेत्यांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत शिवसेनेकडून कसबा विधानसभा आगामी निवडणुकीत ठाकरे गटाला द्यावी, असा प्रस्ताव ठेवण्यात आला. याबाबत विशाल धनवडे यांनी प्रसारमाध्यमांसमोर आपले मत मांडले.

धनवडे म्हणाले, “महाविकास आघाडीची काँग्रेस भवनमध्ये जेव्हा बैठक झाली तेव्हा या बैठकीमध्ये आगामी लोकसभेसाठी प्रचार यंत्रणा कश्या प्रकारे राबवावी या संदर्भात चर्चा झाली. या बैठकीमध्ये कसब्याची जागा ठाकरे गटाला द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. कारण कसबा पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेच्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मनापासून काम केलं आणि धंगेकरांना आमदार बनवलं.”

“लोकसभेलाही सर्व शिवसैनिक धंगेकरांच्या पाठीशी उभे राहातील. यापूर्वीसुद्धा शिवसेनेनं कसब्यामध्ये भाजपाचा आमदार निवडून येण्यास मदत केली आहे तर यावेळी काँग्रेसचा आमदार निवडून येण्यास मदत केली, पण असं करूनही शिवसैनिकांना जो न्याय मिळायला हवा तो मिळत नाही. त्यामुळे यावेळी कसब्याची जागा आम्हाला मिळावी,” असं धनवडे पुढे म्हणाले.

कसबा विधानसभा मतदारसंघ म्हणजे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मस्थान! पुण्यात या विधानसभा मतदारसंघातच शिवसेना वाढली. त्यामुळे ही जागा शिवसेनेला मिळण्यासाठी ते आग्रही असल्याचं धनवडेंनी सांगितलं. मात्र, ही मागणी ते करत असले तरी रवींद्र धंगेकरांचं लोकसभेचं काम करणार नाही, अशी कोणतीही भूमिका घेतली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #congress#CongressBhavan#Lokasabha2024#ravindradhangekar#VishalDhanawade
Previous Post

सौ. सुनेत्रा अजितदादा पवार यांच्याकडून रायरेश्वराला अभिषेक करून शिवजयंती साजरी.

Next Post

‘मावळ’मध्ये महायुतीकडून अपेक्षेप्रमाणे पुन्हा बारणेच, हॅटट्रिकची शक्यता?

Next Post
‘मावळ’मध्ये महायुतीकडून अपेक्षेप्रमाणे पुन्हा बारणेच, हॅटट्रिकची शक्यता?

'मावळ'मध्ये महायुतीकडून अपेक्षेप्रमाणे पुन्हा बारणेच, हॅटट्रिकची शक्यता?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.