DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

जागावाटपावरून मविआत वातावरण तंग?

आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता?

DD News Marathi by DD News Marathi
April 3, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
जागावाटपावरून मविआत वातावरण तंग?

मुंबई प्रतिनिधी :

दि. ०३ एप्रिल २०२४

लोकसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असल्या तरी महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा अजून ‘जैसे थे’च आहे. जागावाटपावरून आघाडीतील नेत्यांमध्ये मतभेद
असल्याचं दिसून येत आहे. तर सांगली आणि भिंवडीच्या जागेवरून आघाडीतील मित्रपक्ष एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. ठाकरे गटाने चर्चा न करता सांगलीतील आपला
उमेदवार जाहीर केला असा आरोप काँग्रेसने केला आहे, तर सांगलीची जागा आपलीच असल्याचा दावा शिवसेनेकडून केला गेला आहे. त्यामुळे मविआमध्ये अद्यापही
जागावाटपावरून धुसफूस सुरू असल्याचं चित्र आहे. म्हणूनच, आघाडीतील जागावाटपाच्या या कुरबुरीवर बोलताना भाजपचे वरिष्ठ नेते गिरीश महाजन म्हणाले, “महाविकास
आघाडी आज तुटेल की उद्या, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे!”

सध्या राज्यातील विविध मतदारसंघांत कोणता उमेदवार द्यायचा यावरून राजकीय पक्षांमध्ये बोलणी सुरू आहेत. मात्र, काही जागांसाठी मित्रपक्षांमध्ये वाद सुरू असल्याचंही दिसतं
आहे. मग आघाडीत सांगली भिवंडीवरून तर नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये धुसफूस सुरू आहे. मात्र, युतीमधील वाद हे हाताळण्याजोगे असून आघाडीमधील मतभेद गंभीर
आहेत असे संगत जागावाटपारून आघाडीतील नेत्यांमध्ये रोज वाद सुरू असल्याचं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं आहे.

महाजन म्हणाले, “वास्तविक शिवसेना आणि राष्ट्रवादी आमच्याकडे आलेली आहे. पाच-सात लोक शरद पवारांकडे तर पाच-सात आमदार उद्धव ठाकरेंकडे उरलेले आहेत. ही जागा
मला मिळाली पाहिजे, ती जागा आमचीच आहे यावरून महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये रोज वाद सुरू आहेत, त्यांच्यात रोज भांडणं सुरू आहेत. त्यांची युती आज तुटेल की उद्या,
अशी परिस्थिती आहे. महाविकास आघाडीचं राज्यात काही खरं दिसत नाही, त्यामुळे या देशात तसेच राज्यात अनुकूल परिस्थिती ही भाजपला आहे.” महाजन यांच्या या वक्तव्यामुळे
आघाडीत खरंच बिघाडी होणार की काय? अश्या चर्चांनी जोर धरला आहे.

 

 

बातमी नक्की शेअर करा
Tags: #MahavikasAghadi#RahulGandhi#SharadPawar#UddhavThackeray
Previous Post

आठवी पास आहे पुणे लोकसभा महाविकास आघाडीचा उमेदवार!

Next Post

सुळे यांनी संस्कार जपत सुनेत्रवाहिनींना पाठिंबा देऊन टाकावा, मानकर असं का म्हणाले?

Next Post
सुळे यांनी संस्कार जपत सुनेत्रवाहिनींना पाठिंबा देऊन टाकावा, मानकर असं का म्हणाले?

सुळे यांनी संस्कार जपत सुनेत्रवाहिनींना पाठिंबा देऊन टाकावा, मानकर असं का म्हणाले?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

February 17, 2026
अजितदादांच्या अकाली निधनानंतर काही वेळातच मंत्रालयात अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची खिरापत!

अजितदादांच्या अकाली निधनानंतर काही वेळातच मंत्रालयात अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची खिरापत!

February 17, 2026
राजपाल यादव यांना दिलासा!

राजपाल यादव यांना दिलासा!

February 16, 2026
अजित पवार यांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सबाबत महत्त्वाची माहिती!

अजित पवार यांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सबाबत महत्त्वाची माहिती!

February 16, 2026
मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची महत्त्वपूर्ण बैठक!

मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची महत्त्वपूर्ण बैठक!

February 16, 2026
केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी एआयला केंद्रस्थान; अजितदादांचे स्वप्न होणार पूर्ण! कृषी मंत्री दत्तात्रय भरणे.

केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी एआयला केंद्रस्थान; अजितदादांचे स्वप्न होणार पूर्ण! कृषी मंत्री दत्तात्रय भरणे.

February 1, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.