DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

कुख्यात डॉन अरुण गवळी तुरुंगातून कायमचा सुटणार!

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे या संदर्भात निर्देश.

DD News Marathi by DD News Marathi
April 5, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
कुख्यात डॉन अरुण गवळी तुरुंगातून कायमचा सुटणार!

मुंबई प्रतिनिधी :
दि. ०५ एप्रिल २०२४

नागपूर खंडपीठाच्या वतीने कुख्यात गुंड अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चार आठवड्यांचा कालावधीही उत्तर देण्यासाठी तुरुंग प्रशासनाला देण्यात आला आहे. २००६ च्या शासन निर्णयाद्वारे कुख्यात डॉन अरुण गवळीने शिक्षेतून सूट देण्याची मागणी केली होती. अरुण गवळीच्या त्या याचिकेवर नागपूर खंडपीठात सुनावणी पूर्ण झाली होती पण कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. न्यायालयाने त्यावर निर्णय देताना अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत. असं जरी असलं तरी तुरुंग प्रशासनाला या संदर्भात उत्तर देण्यासाठी चार आठवड्यांचा कालावधीही देण्यात आला आहे. अरुण गवळीला मुंबईचे नगरसेवक कमलाकार जामसंडेकर हत्या प्रकरणात दोन जन्मठेपेची शिक्षा झाली होती.

हे आहे कमलाकार जामसंडेकर हत्या प्रकरण –
कमलाकार जामसंडेकर यांच्या हत्त्येच्या गुन्ह्यात अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर दिवसभरातली कामं संपवून २ मार्च २००७ या दिवशी संध्याकाळी पावणेपाचला मुंबईतल्या घाटकोपरमध्ये त्यांच्या घरात टीव्ही पाहात होते. ते असल्फा व्हिलेजच्या रुमानी मंजिल चाळीत राहात होते. त्यावेळी अखिल भारतीय सेनेचे उमेदवार अजित राणेंचा कमलाकार जामसंडेकर यांनी ३६७ मतांनी पराभव केला होता. कमलाकार जामसंडेकर यांच्या पत्नी कोमल या कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या .मनाली हिरे ही जामसंडेकर यांची भाची स्वयंपाक घरात काम करत होती. इतक्यात घराबाहेर दोन मोटरसायकल येऊन थांबल्या होत्या ज्यांच्यावरून चार लोक उतरले. त्यातला एकजण जामसंडेकर यांच्या घराकडे येऊन त्यांच्या घरात शिरला. त्याने जामसंडेकर यांच्यावर त्याच्याकडच्या पिस्तुलाने गोळीबार केला. हा गोळीबार पॉईंट ब्लँक रेंजवरुन करण्यात आला. गोळीबार होताच मनाली धावत बाहेर आली तेव्हा कमलाकार जामसंडेकर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले तिने पाहिले आणि तिने मदतीसाठी धावा केला. जामसंडेकर यांच्यावर गोळीबार झाल्याचं कळताच जमा झालेल्या गर्दीचा फायदा घेऊन हल्लेखोर तिथून पळून गेले.

कमलाकार जामसंडेकर यांना रुग्णालयात आणण्यात आलं पण तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. पोलिसांनी हत्येचा तपास यानंतर सुरु केला. मात्र पोलिसांना सुगावा लागत नसला तरी पोलीस मात्र कसून चौकशी करत होते. त्यावेळी त्यांना शोध लागला की या हत्येचे धागेदोरे एका आमदारापर्यंत पोहचले आहेत. अर्थातच तो डॉन अरुण गवळी होता. त्यामुळे या प्रकरणात अरुण गवळीला अटक करण्यात आली. ही सुपारी अरुण गवळीने दिली आहे ही बाब कमलाकार जामसंडेकर यांच्या हत्येनंतर जवळपास वर्षभराने उघड झाली होती. त्यावेळी अरुण गवळी भायखळा मतदारसंघाचा आमदार होता. अरुण गवळीला कमलाकर जामसंडेकर यांची हत्या करण्यासाठी ३० लाख रुपये देण्यात आले होते हे मुंबई पोलिसांना जे पुरावे मिळाले त्यानुसार स्पष्ट झाले. सुपारी देणाऱ्या सदाशिव सुर्वे आणि साहेबराव भिंताडे यांना अरुण गवळीने काम होईल असा विश्वास दिला होता. या दोघांनी दगडी चाळीत येऊनच ३० लाख रुपये अरुण गवळीला दिले होते.

ज्याच्या वयाची ६५ वर्षे पूर्ण झाली आहेत अश्या अशक्त, निम्मी शिक्षा भोगलेल्या कैद्याला शिक्षेतून सूट दिली जाते. या तरतूदीचा आधार घेऊन अरुण गवळीने शिक्षेतून मुदतपूर्व सुटकेची मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने यासंदर्भातले निर्देश आता दिले आहेत. अरुण गवळीचा जन्म १९५५ चा असून तो आत्ता ६९ वर्षांचा आहे. जामसंडेकर हत्या प्रकरणात अरुण गवळी २००७ पासून तुरुंगात शिक्षा भोगत असून तो १६ वर्षांपासून तुरुंगात आहे.

सुटकेसाठीच्या दोन अटी अरुण गवळी पूर्ण करतो हे २००६ च्या परिपत्रकानुसार स्पष्ट दिसतं आहे. त्यामुळे अरुण गवळीच्या सुटकेचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AkhilBharatiySena#ArunGavali#Bhaykhala#DonArunGavali#Mumbai
Previous Post

आता तीन दिवस उष्णतेची लाट…काळजी घ्या!

Next Post

रायगडात सरकारी बाबूंनीही लाटला मोफत धान्य योजनेचा फायदा!

Next Post
रायगडात सरकारी बाबूंनीही लाटला मोफत धान्य योजनेचा फायदा!

रायगडात सरकारी बाबूंनीही लाटला मोफत धान्य योजनेचा फायदा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

October 17, 2025
राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

October 17, 2025
‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

October 17, 2025
कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

October 16, 2025
प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

October 16, 2025
मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

October 16, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.