DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

महाराष्ट्रातील बांधकाम व घरेलू कामगारांना राज्य शासनाचा दिलासा

DD News Marathi by DD News Marathi
May 4, 2021
in महाराष्ट्र
0
हा तर राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्याचा डावः हसन मुश्रीफ.

मुंबई प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी.

दि.०४ मे २०२१

महाराष्ट्रातील बांधकाम व घरेलू कामगारांना आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. या निर्णयाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी कामगार मंत्री ना. हसन मुश्रीफ सरसावले आहेत.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदीत सक्रीय १३ लाख बांधकाम कामगारांना १५०० रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले. यासाठी १६६ कोटी ६३ लाख ९३ हजार ५०० रुपयांचा निधी देण्यात आला आहे. कामगारांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम थेट हस्तांतरण पद्धतीने (डीबीटी) जमा करण्याचे काम सुरू आहे. त्यानुसार आजपर्यंत ११ लाख १० हजार ९२९ नोंदीत बांधकाम कामगारांना अर्थसहाय्य करण्यात आले आहे. गेल्या वर्षीही वाढत्या कोरोना संक्रमणाच्या काळात नोंदित बांधकाम कामगारांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची मदत करण्यात आली होती.

तसेच महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी व नूतनीकरण झालेल्या घरेलू कामगारांसाठी पहिल्या टप्प्यात सक्रिय व जीवित नोंदणी असलेल्या एकूण १ लाख ५ हजार ५०० घरेलू कामगारांना प्रत्येकी दीड हजार रुपयांप्रमाणे एकूण १५ कोटी ८२ लाख ५० हजार रुपये इतका निधी वितरीत करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या निर्णयानुसार महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी व नूतनीकरण झालेल्या १ लाख ५ हजार ५०० घरेलू कामगारांच्या बँक खात्यामध्ये थेट हस्तांतरण (डीबीटी) द्वारे प्रत्येकी दीड हजार रुपये वितरित करण्याची कार्यवाही विकास आयुक्त (असंघटित कामगार) यांच्या स्तरावरून लवकरच करण्यात येत आहे. घरेलू कामगारांच्या थेट खात्यात शासनातर्फे मिळणारा हा निधी जमा होणार असल्याने घरेलू कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

CMOMaharashtra Hasan Mushrif
#MVAfightsagainstCovid #MVAfightsCorona

बातमी नक्की शेअर करा
Previous Post

भाजपाचा अंत्योदयः मजुराची बायको बनली आमदार

Next Post

निवडणूका संपल्याः पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ

Next Post
निवडणूका संपल्याः पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ

निवडणूका संपल्याः पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.