DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

‘या’ शैक्षणिक निर्णयामुळे निवडणुकीत बसणार मोठा फटका?

पुण्यातील शिक्षण संस्थेने शिक्षण मंत्र्यांना पाठविले पत्र!

DD News Marathi by DD News Marathi
April 5, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
‘या’ शैक्षणिक निर्णयामुळे निवडणुकीत बसणार मोठा फटका?

पुणे प्रतिनिधी :
दि. ०५ एप्रिल २०२४

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाही प्रा. शामकांत देशमुख, सहकार्यवाह आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. ज्योत्स्ना एकबोटे यांनी
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र पाठवले आहे.

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) व्यवस्थापनशास्त्र पदवी (बीबीए, बीएमएस), संगणक उपयोजन पदवी (बीसीए) अभ्यासक्रम आपल्या अखत्यारित घेण्याचा निर्णय,
कोणतीही चर्चा न करता घेतला. यंदाच्या या निवडणूक वर्षात या निर्णयामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि अन्य घटकांच्या नाराजीचा मोठा फटका बसू शकतो, अशा नेमक्या शब्दांत
इशारा देऊन किमान एक वर्ष निर्णय स्थगित करण्याची मागणी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे केली.

या संदर्भातील पत्र प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाही प्रा. शामकांत देशमुख, सहकार्यवाह आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. ज्योत्स्ना
एकबोटे यांनी प्रधान यांना पाठवले आहे. एआयसीटीईने घेतलेल्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या समस्या पत्राद्वारे प्रधान यांच्या निदर्शनास आणून देऊन शिक्षण संस्थांना होणाऱ्या त्रास,
अडचणी याकडे त्यांचे लक्ष वेधण्यात आले आहे.

अनेक अडचणी ‘एआयसीटीईने’ घेतलेल्या निर्णयामुळे निर्माण होत आहेत. अभ्यासक्रमांच्या मान्यतेची प्रक्रिया दमवणारी तसेच अनेक प्रकारची माहिती मागणारी आहे. त्यामुळे त्याची
पूर्तता करताना महाविद्यालये, शिक्षण संस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याशिवाय ग्रामीण, आदिवासी, वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फटका
बसणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. या नाराजीचा मोठा फटका निवडणुकीत बसू शकतो, असा सूचक इशारा या पत्रातून देण्यात आला आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AICTE#ProgressiveEducationSociety#SavitribaiPhulePuneUniversityPune
Previous Post

रायगडात सरकारी बाबूंनीही लाटला मोफत धान्य योजनेचा फायदा!

Next Post

ऐश्वर्या व अविनाश नारकरचा दाक्षिणात्य गाण्यावर जबरदस्त डान्स!

Next Post
ऐश्वर्या व अविनाश नारकरचा दाक्षिणात्य गाण्यावर जबरदस्त डान्स!

ऐश्वर्या व अविनाश नारकरचा दाक्षिणात्य गाण्यावर जबरदस्त डान्स!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘नीट’मध्ये महाराष्ट्र अव्वल!!

‘नीट’मध्ये महाराष्ट्र अव्वल!!

June 16, 2025
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस विभागाच्या ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’चे लोकार्पण!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस विभागाच्या ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’चे लोकार्पण!

June 14, 2025
पुणे विभागातील कोविड-19 परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा!

पुणे विभागातील कोविड-19 परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा!

June 14, 2025
होस्टेलवर विमान कोसळलं पण ती वाचली! देव तारी त्याला कोण मारी?

होस्टेलवर विमान कोसळलं पण ती वाचली! देव तारी त्याला कोण मारी?

June 14, 2025
एक चूक अन् बापलेकीचा अंत!

एक चूक अन् बापलेकीचा अंत!

June 14, 2025
अहमदाबाद विमान अपघातातल्या मृतांचा आकडा २७४ वर!

अहमदाबाद विमान अपघातातल्या मृतांचा आकडा २७४ वर!

June 14, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.