DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

महाविकासआघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांच्या गोदामावर कारवाई!

म्हात्रेंचा भाजप उमेदवार कपिल पाटील यांच्यावर पलटवार.

DD News Marathi by DD News Marathi
April 6, 2024
in Uncategorized
0
महाविकासआघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांच्या गोदामावर कारवाई!

ठाणे प्रतिनिधी :
दि. ०६ एप्रिल २०२४

गुरुवारी भिवंडी लोकसभेची उमेदवारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे यांना जाहीर झाली. यानंतर काही तासांतच त्यांच्या गोदाम संकुलावर ‘एमएमआरडीए’चे पथक कारवाई करण्‍यासाठी पोहोचले. मात्र गोडाऊनवरील कोणत्याही कारवाईला न्यायालयाकडून यामध्ये स्थगिती दिल्याने ‘एमएमआरडीए’ प्रशासनाला कारवाई न करताच परत जावे लागले अशी माहिती म्हात्रे यांनी दिली. राजकीय दबावातून ही कारवाई होत असल्याची टीकाही सुरेश म्हात्रे यांनी केली.

भिवंडी येवाई येथे असलेल्या म्हात्रे यांच्या आर. के. लॉजी वर्ल्ड या गोदाम संकुलावर ‘एमएमआरडीए’चे एक पथक गुरुवारी सायंकाळी कोणतीही नोटीस न बजावता गोदाम सील करण्याच्या कारवाईसाठी आले. भिवंडी लोकसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडीतून सुरेश म्हात्रे यांच्या नावाची घोषणा होताच ही कारवाई झाली. यामध्ये एमएमआरडीएचे अधिकारी पोलिस फौजफाटा घेऊन दाखल झाले. यावेळी सुरेश म्हात्रे यांच्या भागीदारांनी संपूर्ण तालुक्यातील गोदाम बांधकामांना संरक्षण देण्यासाठी शासनाने अध्यादेश काढल्याचे त्यांना संगितले. त्यानुसार सर्व बांधकाम संरक्षित करण्यासाठी प्रस्ताव दाखल केला असल्याचेही त्यांनी संगितले. सोबतच उच्च न्यायालयातून स्थगिती आदेश घेतला असल्याची माहितीही या भागीदारांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यामुळे कारवाई न करताच कारवाई करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना परतावे लागले.

एमएमआरडीएच्या या कारवाईबाबत म्हात्रे म्हणाले की, ‘‘मी उभ्या केलेल्या गोदाम व्यवसायातून ९० हजार युवकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. तालुक्यात अनधिकृत गोदाम व्यवसाय भ्रष्टाचाराची जननी कपिल पाटील हेच आहेत. ‘एमएमआरडीए’ राजकीय दबावातून कारवाई करीत आहेत असे सांगून सुरेश म्हात्रे यांनी भाजप उमेदवार कपिल पाटील यांच्यावर पलटवार केला.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #KapilPatil#MahavikasAghadi#MMRDA#SureshMhatre
Previous Post

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराला मदत नाही!

Next Post

प्रकाश आंबेडकरांनी नाना पाटोलेंची उडवली खिल्ली!

Next Post
प्रकाश आंबेडकरांनी नाना पाटोलेंची उडवली खिल्ली!

प्रकाश आंबेडकरांनी नाना पाटोलेंची उडवली खिल्ली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एलियन्स लवकरच पृथ्वीवर उतरण्याची शक्यता?

एलियन्स लवकरच पृथ्वीवर उतरण्याची शक्यता?

July 29, 2025
सलमान खानसोबत शूटिंग अन् अशोक सराफांचा जीव धोक्यात!

सलमान खानसोबत शूटिंग अन् अशोक सराफांचा जीव धोक्यात!

July 29, 2025
“भिक्षा नको, शिक्षा द्या” मोहिम राबविली जाणार!

“भिक्षा नको, शिक्षा द्या” मोहिम राबविली जाणार!

July 29, 2025
गाडीने दोन पलट्या खाल्ल्या, पण वाहातूक पोलिस ठरला देवदूत!

गाडीने दोन पलट्या खाल्ल्या, पण वाहातूक पोलिस ठरला देवदूत!

July 29, 2025
उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर जाण्यास सज्ज?

उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर जाण्यास सज्ज?

July 29, 2025
श्रीनगरमधील चकमकीत पहलगाम हल्ल्यातील तीन संशयित दहशतवाद्यांना कंठस्नान!

श्रीनगरमधील चकमकीत पहलगाम हल्ल्यातील तीन संशयित दहशतवाद्यांना कंठस्नान!

July 28, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.