DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

रंगल्या कंगना गोमांस खात असल्याच्या चर्चा!

कंगनाचं सडेतोड प्रत्युत्तर!

DD News Marathi by DD News Marathi
April 8, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
रंगल्या कंगना गोमांस खात असल्याच्या चर्चा!

मुंबई प्रतिनिधी :
दि. ८ एप्रिल २०२४

अभिनेत्री कंगना रणौतला भाजपाने हिमाचल प्रदेशातल्या मंडीतून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. कंगना रणौत ही पुन्हा एकदा यामुळे चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत तिने सुभाषचंद्र बोस हे देशाचे पहिले पंतप्रधान होते त्यांना गायब करण्यात आलं असं वक्तव्य केलं होतं. तसंच देशाला २०१४ मध्ये स्वातंत्र्य मिळालं या वक्तव्याचं तिने समर्थन केलं होतं. आता पुन्हा एकदा कंगना चर्चेत आली आहे. कंगना गोमांस खाते अशी टीका तिच्यावर होताना दिसते आहे. त्यावर कंगनाने पोस्ट करत स्पष्टीकरण दिलं आहे.

या प्रकरणाला सुरुवात झाली काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपापासून! त्यांनीआरोप केला होता की कंगना रणौत भाजपाची उमेदवार आहे पण ती बीफ खाते. एवढंच नाही तर त्यांनी, कंगनाने स्वतः ही गोष्ट एक्स या सोशल मीडिया साईटवर पोस्ट केली होती की ती बीफ म्हणजेच गोमांस खाते आणि तिला ते खूप आवडतं असा दावाही केला होता. कंगनावर यानंतर चांगलीच टीका होऊ लागली होती. तिला ट्रोलही खूप केलं गेलं. आता कंगनाने या सगळ्या आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. कंगनाबाबत आक्षेपार्ह पोस्ट आणि तिचा अर्धनग्न फोटोही काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनैत यांनी पोस्ट केला होता. त्यावरुन झालेला वाद शमतो न शमतो तोच बीफ खात असल्याचा हा आरोप झाला. ज्यावर कंगनाने स्पष्टीकरण दिलं आहे.

काय म्हणाली कंगना ?
मी गोमांसच काय, कुठल्याही प्रकारचं मांस खात नाही. माझ्याबाबत अफवा पसरवल्या जात आहेत ही बाब लज्जास्पद आहे. मी गेल्या काही दशकांपासून योग आणि आयुर्वेदिक जीवनशैलीचा अंगिकार केला आहे. अशा प्रकारचे आरोप माझी प्रतिमा मलीन करण्यासाठी माझ्यावर केले जात आहेत. मात्र मला याने काहीही फरक पडत नाही. मी गोमांस खाते असा प्रचार केवळ माझी प्रतिमा कलंकित करण्यासाठी केला जातो आहे. मी एक स्वाभिमानी हिंदू असून माझ्याविषयी दिशाभूल करणारी वक्तव्यं करुन काहीही साध्य होणार नाही. जय श्रीराम! अशी पोस्ट करत कंगनाने प्रत्युत्तर दिलंआहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #Beef#BJP#Hindu#KanganaRanaut
Previous Post

निवडणुकीच्या रिंगणात आनंदराज आंबेडकर! अमरावती मतदारसंघातून लढण्याचे नक्की?

Next Post

राहुल गांधींनी आता ब्रेक घेणे योग्य!

Next Post
राहुल गांधींनी आता ब्रेक घेणे योग्य!

राहुल गांधींनी आता ब्रेक घेणे योग्य!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हिंजवडीचं सगळं आयटी पार्क बंगलोर-हैदरबादला चाललंय!

हिंजवडीचं सगळं आयटी पार्क बंगलोर-हैदरबादला चाललंय!

July 26, 2025
लाडकी बहीण योजनेचा लाभ १४ हजारहून अधिक पुरुषांनी लाटला !

लाडकी बहीण योजनेचा लाभ १४ हजारहून अधिक पुरुषांनी लाटला !

July 26, 2025
काका-पुतण्या वाद बॉलिवूडमध्येही आहे!

काका-पुतण्या वाद बॉलिवूडमध्येही आहे!

July 25, 2025
हनी ट्रॅप प्रकरणावरुन झडतायत आरोप-प्रत्यारोप!

हनी ट्रॅप प्रकरणावरुन झडतायत आरोप-प्रत्यारोप!

July 25, 2025
यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी पारधी समाजाच्या वनहक्क जमिनींवर गावगुंडांचा बळजबरीने ताबा!

यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी पारधी समाजाच्या वनहक्क जमिनींवर गावगुंडांचा बळजबरीने ताबा!

July 25, 2025
नागपुरात अनुसूचित जाती-जमाती तक्रार निवारण परिषदेचे आयोजन!

नागपुरात अनुसूचित जाती-जमाती तक्रार निवारण परिषदेचे आयोजन!

July 25, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.