DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

राहुल गांधींच्या पराभवासाठी भाजप नाही तर मित्रपक्षच उतावीळ!

वायनाडमध्ये बसणार दणका?

DD News Marathi by DD News Marathi
April 8, 2024
in राजकीय
0
राहुल गांधींच्या पराभवासाठी भाजप नाही तर मित्रपक्षच उतावीळ!

केरळ प्रतिनिधी :

दि. ०८ एप्रिल २०२४

सलग दुसऱ्यांदा राहुल गांधी वायनाडमधून निवडणूक लढवत आहेत. मागील निवडणुकीत दणदणीत विजय मिळाला असला तरी यावेळची निवडणूक सोपी राहिली नसल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी 2019 नंतर यावेळीही केरळातील वायनाड हा लोकसभा मतदारसंघ निवडणे पसंत केले आहे. मागील निवडणुकीत त्यांचा अमेठीतून पराभव झाला होता तर वायनाडमध्ये त्यांनी विजय मिळवला होता. यावेळी त्यांच्या अमेठीतून लढण्याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. त्यांच्यासाठी वायनाडसुरक्षित मानले जात असले तरी यावेळी तिथे भाजपने नव्हे तर इंडिया आघाडीतील त्यांच्याच मित्रपक्षाने आव्हान उभे केले आहे.

वायनाडमध्ये राहुल यांच्या विरोधात भाजपसह कम्युनिस्ट पक्षानेदेखील उमेदवार उतरवला आहे. भाजपकडून प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन रिंगणात आहेत तर सीपीआयने महासचिव डी. राजा यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ नेत्या एनी राजा यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे राहुल गांधींसाठी ही लढाई अवघड झाली आहे.

सीपीआय ‘इंडिया आघाडी’चा घटक पक्ष आहे. ते इतर काही राज्यांमध्ये एकत्रित लोकसभा निवडणूक लढवत आहेत. पण केरळमध्ये मात्र काँग्रेस आणि सीपीआय कट्टर राजकीय विरोधक असल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे सीपीआयने एनी राजा यांना उमेदवारी देत राहूल यांच्या अडचणी वाढवल्याचे मानले जात आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे सीपीआयने ही निवडणूक यावेळी गांभीर्याने घेतल्याची चर्चा आहे.

सातत्याने वायनाडचा दौरा राज्याचे मुख्यमंत्री आणि पक्षाच्या बड्या नेत्यांकडून होत आहे. इतर मुद्द्यांवरून राहुल आणि काँग्रेसला ते घेरत आहेत. प्रचारसभांमध्ये अद्याप राहूल यांनी ‘सीएए’च्या मुद्यावर भाष्य केलेले नाही. इंडिया आघाडीत असलेल्या सीपीआयमध्ये त्यावरूनही नाराजी आहे.

मुस्लिम मतदारांच्या समर्थनाशिवाय वायनाडमध्ये विजय अशक्य असल्याचे मानले जाते. डाव्यांची सत्ता असलेले सरकार त्यामुळेच केरळमध्ये सतत ‘सीएए’ला विरोध करत असते आणि याचाच फटका भाजपऐवजी राज्यात काँग्रेसला बसत आहे. काँग्रेससमोर त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे. ‘सीएए’चे समर्थन न केल्यास केरळमधील हिंदूंची मते दूर जाण्याची भिती तर सीएएचा विरोध न केल्यास मुस्लिम मते विभागण्याचे संकट, या द्विधा मनस्थितीत काँग्रेस आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांनी जेव्हा बुधवारी वायनाडमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी त्यांच्या रॅलीमध्ये मित्रपक्ष असलेल्या इंडियन यूनियन लीगचे झेंडे दिसले नाहीत. त्यावरूनही डाव्या पक्षांसह भाजपनेसुद्धा काँग्रेसला टार्गेट केले आहे. विशेष म्हणजे या रॅलीमध्ये काँग्रेसचे झेंडेसुद्धा दिसत नव्हते. या संपूर्ण रोड शोमध्ये तिरंगाच फडकत होता.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #CPI#INC#Kerala#RahulGandhi#Waynad
Previous Post

प्रशांत किशोर यांच्या विधांनांनी काँग्रेससह ‘इंडिया’ गटाचं वाढवलं टेन्शन!

Next Post

शिवतारेंचा एक असाही यू टर्न!

Next Post
शिवतारेंचा एक असाही यू टर्न!

शिवतारेंचा एक असाही यू टर्न!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सगळेच निर्दोष, तर मग बॉम्बस्फोट घडवणारे कोण?

सगळेच निर्दोष, तर मग बॉम्बस्फोट घडवणारे कोण?

July 31, 2025
१७ वर्षांची प्रतीक्षा संपली. मालेगाव स्फोटातील सातही आरोपींची निर्दोष सुटका!

१७ वर्षांची प्रतीक्षा संपली. मालेगाव स्फोटातील सातही आरोपींची निर्दोष सुटका!

July 31, 2025
कल्याणी समुहातील वरिष्ठ अकाऊंटंटचे चाकणच्या हॉटेलातआत्महत्त्या प्रकरण!

कल्याणी समुहातील वरिष्ठ अकाऊंटंटचे चाकणच्या हॉटेलातआत्महत्त्या प्रकरण!

July 31, 2025
चांपा-हळदगाव-खापरी रस्ता दुरुस्तीसाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा रास्ता रोको!

चांपा-हळदगाव-खापरी रस्ता दुरुस्तीसाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा रास्ता रोको!

July 31, 2025
नागपूर नगरीचे संस्थापक गोंड राजे बक्त बुलंद शहा यांची जन्म जयंती उत्साहात साजरी!

नागपूर नगरीचे संस्थापक गोंड राजे बक्त बुलंद शहा यांची जन्म जयंती उत्साहात साजरी!

July 31, 2025

पुण्यातील पार्टी प्रकरणात पोलिस ‘ड्रग पेडलर’ च्या शोधात!

July 30, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.