DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

पवार अन् ठाकरेंसमोर काँग्रेसची शरणागती?

शेवटी सांगली, भिवंडीवर सोडलं पाणी.

DD News Marathi by DD News Marathi
April 9, 2024
in राजकीय
0
पवार अन् ठाकरेंसमोर काँग्रेसची शरणागती?

मुंबई प्रतिनिधी :
दि. ०९ एप्रिल २०२४

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि काँग्रेसमध्ये सांगली आणि भिवंडीच्या जागेवरून वाद सुरु होता. या जागांवर तोडगा निघण्याची शक्यता जरी वर्तवण्यात येत होती तरी आता सांगली आणि भिवंडीच्या जागेवर काँग्रेसनं पाणी सोडलं आहे. ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील सांगलीमधून तर राष्ट्रवादीचे सुरेश उर्फ बाळ्यामामा भिवंडीतून लढणार असल्याचं नक्की झालं आहे. कॉंग्रेसच्या या तडजोडीमुळे सांगली आणि भिवंडीतील काँग्रेसचे कार्यकर्ते काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महाविकास आघाडीची पत्रकार परिषद मुंबईतील नरीमन पॉइंट येथील ‘शिवालय’ येथे पार पडली. याला शिवसेना ( ठाकरे गट ) अध्यक्ष उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्य नाना पटोले, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील, शेकापचे नेते जयंत पाटील आणि महाविकास आघाडीतील नेते उपस्थित होते.

नाना पटोले याचं स्पष्टीकरण देताना म्हणाले, “काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना केंद्रातील हुकूमशहा सरकारनं दिलेली वागणूक सारा देश जाणून आहे. सोनिया गांधींची प्रकृती ठिक नसतानादेखील कित्येक तास त्यांना ईडीच्या कार्यालयात बसवून ठेवलं गेलं, हे काँग्रेसचा कार्यकर्ता कदापि विसरणार नाही. त्यामुळे हुकूमशाही प्रवृत्तीच्या विरोधात काँग्रेसची ही लढाई आहे. त्यामुळेच आम्ही जागावाटपाचा तिढा संपुष्टात आणला आहे. मोठं मन करून आमच्या कार्यकर्त्यांनी, देशातील भाजप सरकारला सत्तेतून घालविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. एकमेकांनाच आमची मते पडणार आहेत.”

 

बातमी नक्की शेअर करा
Tags: #Bhivandi#congress#INC#NanaPatole#Sangali#SharadPawar#SoniyaGandhi
Previous Post

दक्षिण मुंबईत ठाकरे शिवसेनेचा उमेदवार रोखण्यासाठी भाजपची खेळी.

Next Post

नाशिक मतदार संघाच्या वादावर महाजनांनी सांगितला ‘हा’ उपाय!

Next Post
नाशिक मतदार संघाच्या वादावर महाजनांनी सांगितला ‘हा’ उपाय!

नाशिक मतदार संघाच्या वादावर महाजनांनी सांगितला 'हा' उपाय!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.