DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

विरोधक अन् मित्र असावा तर शिवतारेंसारखा!

अजितदादांकडून शिवतारेंचे विशेष कौतुक.

DD News Marathi by DD News Marathi
April 18, 2024
in राजकीय
0
विरोधक अन् मित्र असावा तर शिवतारेंसारखा!

पुणे प्रतिनिधी :
दि. १८ एप्रिल २०२४

आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील कुलदीप कोंडे यांनाविजय शिवतारे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत आणले. याचा आनंद व्यक्त करत अजित पवारांनी त्यांचे कौतुकही केले.
आज पुण्यात बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी सभा झाली. त्यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार त्यासाठी एकाच व्यासपीठावर आहेत. यावेळी शिंदेंच्या सेनेत शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक कुलदीप कोंडे देशमुख यांनी प्रवेश केला.

शिवसेनेचे नेते विजय शिवतारे हे अजित पवारांचे भाषण सुरू असतानाच कुलदीप कोंडेंना व्यासपीठावर घेऊन आले. जे लाखाने मतं घेतात ते कुलदीप कोंडे देशमुख यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे असे, ते उध्दव ठाकरेंच्या पक्षातून शिंदेच्या सेनेत येत असल्याचे समजताच अजितदादा म्हणाले. भोर, वेल्हा, मुळशीमध्ये त्यांची किती ताकद आहे, हे सगळे जाणून आहेत. विजय शिवतारेंनी ही किमया केली आहे, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद.

विरोधक कसा असावा लागतो, हे शिवतारेंकडे बघून शिका. विजयबापूंकडे बघून, मित्रही कसा असावा लागतो, तेही शिका. पडेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल पण एकदा मैत्री केली की, मैत्रीला अंतर पडू देत नाही. विजय शिवतारेंचे काम अशापध्दतीचे असल्याचे कौतुक अजित पवारांनी केले.

बारामती लोकसभा मतदारसंघातून शिवतारे यांनी उमेदवारीची घोषणा केली होती. पण नंतर माघार घेत त्यांनी सुनेत्रा पवारांसाठी प्रचार सुरू केला. त्यासाठी सासवडमध्ये त्यांनी सभाही घेतली. त्यानंतर त्यांनी दादांना, आज कोंडे यांना पक्षात आणत मोठा दिलासा दिला आहे. भोर विधानसभा मतदारसंघात कोंडे यांनी दोनदा निवडणूक लढली आहे. त्यावेळी त्यांना लक्षणीय मते मिळाली होती.

अजितदादा भाषणादरम्यान बोलताना म्हणाले, चांगल्यापध्दतीने आता आपली युती झाली आहे. तिला कुठेही दृष्ट लागेल असे काम करायचे नाही. पुरंदर आणि हवेली मतदारसंघात विजय शिवतारेंमुळे ताकद वाढली आहे. तर कुलदीप कोंडेंमुळे भोर-वेल्हामध्ये आपली ताकद वाढली आहे. महायुतीकडून त्यांनाही तसाच मानसन्मान मिळेल, असा शब्द मी कोंडेंना देतो.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AjitPawar#KuldipKonde#PuneLokasabha#SunetraPawar#VijayShivtare
Previous Post

अखेर नारायण राणे महायुतीचे उमेदवार, सामंतांची माघार!

Next Post

मतदानाकरिता १२ पुरावे ग्राह्य धरले जाणार!

Next Post
या लोकसभेने दाखवून दिले, ‘पुणे तिथे काय उणे’!

मतदानाकरिता १२ पुरावे ग्राह्य धरले जाणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अजितदादांच्या अकाली निधनानंतर काही वेळातच मंत्रालयात अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची खिरापत!

अजितदादांच्या अकाली निधनानंतर काही वेळातच मंत्रालयात अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची खिरापत!

February 17, 2026
राजपाल यादव यांना दिलासा!

राजपाल यादव यांना दिलासा!

February 16, 2026
अजित पवार यांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सबाबत महत्त्वाची माहिती!

अजित पवार यांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सबाबत महत्त्वाची माहिती!

February 16, 2026
मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची महत्त्वपूर्ण बैठक!

मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची महत्त्वपूर्ण बैठक!

February 16, 2026
केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी एआयला केंद्रस्थान; अजितदादांचे स्वप्न होणार पूर्ण! कृषी मंत्री दत्तात्रय भरणे.

केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी एआयला केंद्रस्थान; अजितदादांचे स्वप्न होणार पूर्ण! कृषी मंत्री दत्तात्रय भरणे.

February 1, 2026

अजित पवारांनी माध्यमांचे स्‍वातंत्र्य जपले

January 31, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.