DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

मोदींच्या चार दिवसांत नऊ सभा होणार!

पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातही हंगामा!

DD News Marathi by DD News Marathi
April 27, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0

पुणे प्रतिनिधी :
दि. २७ एप्रिल २०२४

केंद्रात सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील 48 पैकी 45 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. महायुतीच्या माध्यमातून महाराष्ट्रात सत्ताधारी असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मदतीने निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपसह महायुतीमध्ये सहभागी असलेल्या पक्षांच्या नेत्यांनी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा संकल्प सोडला आहे. त्यासाठी जोरदार ताकद लावली जात असल्याचे चित्र आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकाधिक सभा घेण्याचे नियोजन, महाराष्ट्रातील लोकसभेच्या अधिकाधिक जागा विजयी व्हाव्यात, यासाठी महायुतीकडून केले जात आहे. मोदींच्या सभांचा झंझावात तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात लोकसभेचे मतदान होत असलेल्या मतदारसंघात असणार आहे. चार दिवसांमध्ये नऊ जाहीर सभा, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील 14 उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रात सोमवार 29 एप्रिल आणि मंगळवारी 30 एप्रिल या दोन दिवशी सहा सभा होणार आहेत. या दोन दिवसांत त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे.

सातारा, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, बीड, धाराशिव, लातूर तसेच नगर जिल्ह्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभा होणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघांत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा घेण्यात याव्यात, अशी मागणी केली जात होती. भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून यासाठीचे नियोजन केले जात होते. नागरिकांमध्ये पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल मोठा विश्वास आहे. त्याचा फायदा महायुतीच्या उमेदवारांना होण्यासाठी मोदी यांची सभा घेण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत होती.

दुसऱ्या टप्प्याचे मतदान महाराष्ट्रात पूर्ण झाले असून, आता तिसऱ्या टप्प्यातील प्रचार सुरू झाला आहे. 11 मतदारसंघासाठी तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात मतदान होत आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील सर्वाधिक मतदारसंघ आहेत. त्यामुळे भाजप महायुतीने या मतदारसंघांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याची रणनीती आखली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर आणि माढा येथील दोन्हीही लोकसभा मतदारसंघांत सभा घेणार आहेत. भारतीय जनता पक्ष या दोन्हीही जागा लढवत आहे. याशिवाय मोदी त्यांच्या जाहीर सभा कोल्हापूर आणि सातारा येथेही घेणार आहेत. मोदी चार दिवसांत तब्बल नऊ सभा घेणार आहेत.

30 एप्रिलला पुण्यात, महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. पुण्यात 29 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. वास्तविक २९ एप्रिललाच उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार होती. मात्र, आता ती पुढे ढकलून ३० एप्रिलला केली आहे. महाविकास आघाडीच्या बारामती आणि पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांसाठी ही सभा होणार आहे. या सभेचे नियोजन वारजे भागात करण्यात आले आहे. महाविकास आघाडीकडून पुण्यात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर तर बारामतीमधून खासदार सुप्रिया सुळे निवडणूक लढत आहेत.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #NarendraModi#PuneLokasabha2024
Previous Post

अजित पवारांना निवडणूक अधिकाऱ्यांकडून क्लीन चिट!

Next Post

मला तर मत मागताना लाज वाटली असती!

Next Post
मला तर मत मागताना लाज वाटली असती!

मला तर मत मागताना लाज वाटली असती!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.