शिरूर प्रतिनिधी :
दि. ०८ मे २०२४
हायप्रोफाईल आणि सर्वात जास्त चर्चिली गेलेली बारामतीची निवडणूक आता पार पडली आहे. सुनेत्रा अजितदादा पवार आणि सुप्रिया सुळे यांचे भविष्य EVM मध्ये बंद झाले आहे. आता ४ जूनलाच कोणी बाजी मारली हे स्पष्ट होईल. मात्र या निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार या दोघांनीही आपला मोर्चा शिरूरकडे वळवला आहे. दोन्ही पवारांकडून आता शिरूमध्ये सभांचा धडाका होणार आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) आढळराव पाटील यांच्यासाठी शिरूरमध्ये एकाच दिवसात चार सभा अजित पवार घेणार आहेत. तर उद्या ९ मे रोजी शरद पवार हेही अमोल कोल्हेंसाठी शिरूरमध्ये सभा घेणार आहेत. या सर्व राजकीय घडामोडींमुळे लोकसभेच्या ४ थ्या टप्प्यातसुद्धा पवार विरुद्ध पवार अशीच लढत रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिरूरमधून आढळराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे अश्या होणार्या लढतीने वातावरण चांगलेच तापले आहे. ही लढाई या दोघांत जरी होत असली तरी बारामतीप्रमाणेच तिचे स्वरूप हे पवार विरुद्ध पवार असेच झाले आहे. प्रतिष्ठेचा प्रश्न दोन्ही बाजूंसाठी महत्त्वाचा असल्याने दोन्ही बाजूंकडून जोर लावला जातो आहे. आपण केलेल्या कामांचे आणि दुसर्या पक्षाने न केलेल्या कामांचे पाढे दोन्ही बाजूंकडून वाचले जात आहेत.