DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

तृतीयपंथीयांकडून नागपुरात सर्वसामान्यांची लूट!

मुलगा जन्मल्यास घेतात सोन्याची साखळी!

DD News Marathi by DD News Marathi
May 14, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0

नागपूर प्रतिनिधी :
दि. १४ मे २०२४

नागपूर : उपराजधानी नागपुरात तृतीयपंथीय सामान्यांकडून जबरदस्तीने वसुली करत असल्याचे चित्र आहे. तृतीयपंथीय ५ ते ११ हजार रुपयांची वसुली लग्न असलेल्या घरातून करतात. ते गर्भवती महिला असलेल्या घरांचा शोध घेतात. या घरांना भेट देऊन येथे मुलगा जन्मल्यास सोन्याच्या साखळीची मागणी करतात, वेळप्रसंगी त्यासाठी दमही देतात.

विविध भागात ट्रॅफिक सिग्नलवर किंवा घरगुती समारंभात तृतीयपंथीयांकडून पैसे मागण्याचे प्रकार नागपुरात नवीन नाहीत. बर्‍याच वेळेस तृतीयपंथीय पैसे मागण्यासाठी बळजबरी करतात. एवढेच नव्हे तर पैसे देण्यास नकार देणाऱ्यांशी वाद घातला जातो. मध्यंतरी बळजबरी करणाऱ्या तृतीयपंथीयांविरुद्ध नागपूर शहर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला होता. शहरातील विविध भागातील सिग्नलवर त्यामुळे तृतीयपंथीय दिसण्याचे प्रमाण कमी झाले.

आता वेगवेगळ्या भागातील नागरी वस्त्यांवर शहरातील तृतीयपंथीयांनी लक्ष केंद्रित केले आहे. ५ ते ११ हजार रुपयांची वसुली येथे लग्न असलेल्या घरातून केली जात आहे. त्याचप्रमाणे तृतीयपंथीय गर्भवती महिला असलेल्या घरांचाही शोध घेतात, प्रथम ते या घरात जाऊन भिंतीच्या दर्शनी भागात विशिष्ट क्रमांक व चिन्ह नोंदवतात. त्यानंतर मुलगा जन्मल्यास किमान सोन्याची साखळी देण्याबाबत संबंधित कुटुंबीयांवर दबाव टाकतात.

हल्ली हा प्रकार नागपुरातील झिंगाबाई टाकळी, बाबा फरीदनगर, गायत्रीनगरसह इतर काही भागात जास्तच वाढला आहे. पैसे देण्यास नकार देणार्‍यांचा तृतीयपंथीय त्यांच्याशी उद्धट बोलून नातेवाईकांपुढे त्यांचा अपमान करतात. काही जण वाद टाळण्यासाठी गुपचूप पैसे देऊन मोकळे होतात. तरीही शहर पोलीस काहीही करत नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होतो आहे.

गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील प्रत्येक सदस्य घरात एखादे लग्न असल्यास पैसे वाचवून नियोजन करतो. जवळच्या नातेवाईकांकडूनही आर्थिक अडचण येऊ नये म्हणून उसनवारीवर पैसे घेतले जातात. परंतु तृतीयपंथीय या पद्धतीने सामान्यांना लुटत असल्याने त्यांना काय कर्ज करून पैसे द्यायचे का? हा प्रश्न झिंगाबाई टाकळीसह परिसरातील नागरिक नाव न टाकण्याच्या अटीवर विचारत आहेत.

यापूर्वीच तृतीयपंथीयांबाबत शहर पोलिसांनी अधिसूचना काढली आहे. कुणाकडूनही बळजबरीने पैसे तृतीयपंथीयांना घेता येत नाहीत. तृतीयपंथीय त्रास देत असतील तर नागरिकांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी. पोलिसांनी नियम मोडणाऱ्या तृतीयपंथीयांवर यापूर्वीही कारवाई केली आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #Nagpur#nagpurpolice#transgender
Previous Post

“अजित पवारांना शरद पवार हे व्हिलन बनवत होते आणि डावलतही होते कारण…!”

Next Post

लग्नपत्रिका वाचून गोंधळले पाहुणे!

Next Post
लग्नपत्रिका वाचून गोंधळले पाहुणे!

लग्नपत्रिका वाचून गोंधळले पाहुणे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

October 17, 2025
राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

October 17, 2025
‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

October 17, 2025
कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

October 16, 2025
प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

October 16, 2025
मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

October 16, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.