नवी दिल्ली प्रतिनिधी :
दि. १५ मे २०२४
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदान आता पार पडले आहे. पुढील टप्प्यांसाठी सारेच पक्ष जोमाने प्रचाराला लागले आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला अजित ए.पी. शहा, एन. राम आणि माजी न्यायमूर्ती मदन बी. लोकूर यांनी राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून निवडणुकीतील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चेसाठी आमंत्रित केले होते. सार्वजनिक चर्चेच्या पुढाकाराचे कौतुक करत राहुल गांधी यांनी चर्चेत भाग घेण्यास आनंद होईल, असे म्हटले होते. मीते स्वतः किंवा पक्षाचे प्रमुख मल्लिकार्जुन खरगे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर सार्वजनिक चर्चा करू इच्छितात, असे मत त्यांनी व्यक्त केले. मात्र, पंतप्रधानांनी यावर प्रतिसाद दिला नाही.
त्यानंतर हे आव्हान भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांनी स्वीकारले आणि युवा विंगचे उपाध्यक्ष अभिनव प्रकाश यांची संभाव्य चर्चेसाठी निवड केली. मोदींना दिलेल्या आव्हानावर तेजस्वी सूर्या यांनी आधी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ते म्हणाले होते की, काँग्रेस नेते पंतप्रधानपदाचे उमेदवारही नाहीत. मात्र, आता दोन प्रतिस्पर्धी पक्षांमधील सार्वजनिक चर्चेचा प्रस्ताव त्यांनी स्वीकारला आहे.
गांधी घराण्याचे पारंपरिक क्षेत्र असलेल्या उत्तर प्रदेशमधील रायबरेली येथील भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष आहेत. सूर्या यांनी ‘एक्स’वर लिहिले, “ते केवळ आमच्या युवा शाखेचे एक प्रतिष्ठित नेते नाहीत, तर ते सरकारद्वारे लागू केलेल्या धोरणांचे आणि सुधारणांचे स्पष्ट प्रवक्ते आहेत”. दलित समुदायातील पासी जातीतून ३० वर्षीय अभिनव प्रकाश येतात. दलित समुदायाची संख्या रायबरेलीमध्ये ३० टक्क्यांहून अधिक आहे. या मतदारसंघातून यंदा राहुल गांधी लोकसभा निवडणूक लढवत आहेत.