DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

भाजपाला कश्यासाठी हव्यात चारशे पार जागा?

जाणून घ्या नेमके कारण!

DD News Marathi by DD News Marathi
May 16, 2024
in ताज्या बातम्या, राजकीय
0
भाजपाला कश्यासाठी हव्यात चारशे पार जागा?

रामगढ (झारखंड) प्रतिनिधी :
दि. १६ मे २०२४

भारतीय जनता पार्टीने या लोकसभा निवडणुकीमध्ये ‘चारशेपार’ जाणार असल्याची घोषणा केलेली आहे; तर दुसरीकडे भाजपा ‘चारशेपार’ नव्हे सत्तेतून पायउतार होईल, असा दावा विरोधी पक्षांकडून केला जातो आहे. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सर्मा यांनी बुधवारी (१५ मे) झारखंडमधील रामगढच्या प्रचारसभेत, पाकव्याप्त काश्मीरवर पुन्हा ताबा मिळवण्यासाठी आणि संपूर्ण देशभरात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजपाला चारशेपार जाण्याची गरज आहे, असे विधान केले आहे.

भारतीय जनता पार्टीला ‘चारशेपार’ जागा देशाची राज्यघटना बदलवण्यासाठीच हव्या असल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जातो आहे, तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीकडून, आम्ही देशाच्या घटनेच्या संरक्षणासाठी कटिबद्ध असल्याचा दावा केला जातो आहे. भारतीय जनता पार्टीचे उत्तर कन्नड मतदारसंघाचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी १० मार्च रोजी याबाबत विधान करताना म्हटले आहे की, “आजवर काँग्रेसने घटनेतील मूलभूत गोष्टींमध्ये नको ते बदल केल्यामुळे घटना दुरुस्ती होणे गरजेची आहे. विशेषत: हिंदू समाजाबाबतचे कायदे बदलण्याची गरज आहे. हे बदल करायचे असतील तर आम्हाला दोन-तृतीयांश बहुमताची गरज आहे.” मात्र हेगडे यांच्या या सभेतील वक्तव्यांपासून भाजपने अंतर राखले आहे.

मध्य प्रदेशमधील खरगोन आणि धर जिल्ह्यामध्ये ७ मे रोजी बोलताना पंतप्रधान मोदींनी चारशेपार जागा कशासाठी हव्या आहेत, याची मांडणी केली. ते म्हणाले की काँग्रेस , “भाजपाला देशाची घटना बदलण्यासाठी चारशेपार जागा हव्या आहेत, असा खोटा प्रचार करत आहे. मात्र, २०१९ ते २०२४ या कार्यकाळात एनडीएकडे चारशेपार जागा आधीपासूनच होत्या. मात्र, आता एकट्या भाजपाला चारशेपार जागा हव्या आहेत; जेणेकरून काँग्रेस काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा आणणार नाही. काँग्रेस राम मंदिराला ‘बाबरी लॉक’ लावू नये, यासाठी आम्हाला चारशेपार जागा हव्या आहेत”, असेही ते म्हणाले. पुढे ते म्हणाले की, “भारत सध्या ऐतिहासिक टप्प्यावर आहे. देशात ‘व्होट जिहाद’ असायला हवा की ‘रामराज्य’ याचा निर्णय आता तुम्हालाच घ्यायचा आहे.”

महाराष्ट्रातील पालघरमध्ये बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी ‘चारशेपार’ जागा हव्या असल्याचे विधान केले आहे.

केंद्रीय पंचायती राज मंत्री गिरीराज सिंह आपल्या वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जातात. बुधवारी (१५ मे) एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते म्हणाले की, “पंडित जवाहरलाल नेहरुंनी हिंदूंचा विश्वासघात केला. आम्हाला चारशेपार जागा मिळतील, तेव्हा आम्ही काशी, मथुरा आणि अयोध्येचा अभूतपूर्व असा विकास करू.”

बुधवारी (१५ मे) झारखंडमध्ये बोलताना आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा म्हणाले की, “या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला चारशेपार जागा मिळाल्या तरच पाकव्याप्त काश्मीर भारतात आणता येईल.” ते पुढे म्हणाले की, “२०१९ मध्ये भाजपाला तीनशेपार जागा मिळाल्या म्हणूनच CAA कायदा, राम मंदिराची उभारणी आणि कलम ३७० रद्द करता आले. अगदी तसेच ‘श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर’ आणि ‘ज्ञानव्यापी मंदिरा’च्या उभारणीसाठीही चारशेपार जागांची गरज आहे.”

बातमी नक्की शेअर करा
Tags: #400Paar#AmitShah#BJP#ConstitutionOfIndia#GirirajSinh#HimantaBiswasarma
Previous Post

नारकर जोडप्याचा आणखी एक जबरदस्त डान्स!

Next Post

इंधनासाठी पेट्रोल पंपावर थांबले अन् होर्डिंग कोसळलं!

Next Post
इंधनासाठी पेट्रोल पंपावर थांबले अन् होर्डिंग कोसळलं!

इंधनासाठी पेट्रोल पंपावर थांबले अन् होर्डिंग कोसळलं!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, नाहीतर राज्यव्यापी आंदोलन!”

“धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, नाहीतर राज्यव्यापी आंदोलन!”

December 10, 2025
जर्मन मेट्रोत सेलिब्रिटीच्या शेजारी बसला आणि नशीब फळफळले!

जर्मन मेट्रोत सेलिब्रिटीच्या शेजारी बसला आणि नशीब फळफळले!

December 10, 2025
महाराष्ट्रात EVM ची सुरक्षा पुरेशी वाटत नाही?

महाराष्ट्रात EVM ची सुरक्षा पुरेशी वाटत नाही?

December 10, 2025
बायकोचा फोन आला अन् तरुणाने आत्महत्त्या केली!

बायकोचा फोन आला अन् तरुणाने आत्महत्त्या केली!

December 9, 2025
नोकरी मिळणार या आशेने लग्न केलेल्या किरणची आत्महत्त्या!

नोकरी मिळणार या आशेने लग्न केलेल्या किरणची आत्महत्त्या!

December 9, 2025
महायुतीत महाकलह? कल्याण-पश्चिमेत संघर्ष चिघळला!

महायुतीत महाकलह? कल्याण-पश्चिमेत संघर्ष चिघळला!

December 9, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.