DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

इंधनासाठी पेट्रोल पंपावर थांबले अन् होर्डिंग कोसळलं!

घाटकोपर दुर्घटनेत दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू.

DD News Marathi by DD News Marathi
May 17, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
इंधनासाठी पेट्रोल पंपावर थांबले अन् होर्डिंग कोसळलं!

घाटकोपर प्रतिनिधी :
दि. १७ए २०२४

काल रात्री (दि. १५ मे) रोजी घाटकोपरमध्ये जाहिरातीचे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत आणखी दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता मृतांची संख्या १६ वर पोहोचली आहे. मनोज चांसोरिया (वय ६०) आणि त्यांची पत्नी अनिता चांसोरिया (वय ५९) यांचे मृतदेह काल एका वाहनातून बाहेर काढण्यात आले. मनोज चांसोरिया हे मुंबईतील विमानतळाचे माजी विमानतळ संचालक होते. इतर १०० लोकांसारखे तेही पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी जाहिरातीचे होर्डिंग कोसळले तेव्हा आले होते. मनोज चांसोरिया यांनी मुंबईच्या एटीसीमध्ये काम केले होते. वर्षभरापूर्वीच निवृत्त झाल्यापासून ते पत्नीसह जबलपूर येथे वास्तव्यास होते.

चांसोरिया दाम्पत्याच्या मृत्यूमुळे मुंबईमधील एटीसी विभागातील कर्मचारी हळहळले. एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून मनोज चांसोरिया यांची ओळख होती. चांसोरिया दाम्पत्याचा मुलगा अमेरिकेत आहे. त्यामुळे तेही काही दिवसांनी देशाबाहेर जाणार होते आणि व्हिसासंबंधी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुंबईत आले होते. व्हिसाची प्रक्रिया पूर्ण करून जबलपूरला परत जात असताना वाटेत इंधन भरण्यासाठी ते पेट्रोल पंपावर थांबले आणि तेवढ्यात काळाने त्यांच्यावर घाला घातला.

चांसोरिया यांचा मोबाइल फोन, सोमवारी (१३ मे) जेव्हा दुपारच्या दरम्यान वादळी वाऱ्यामुळे घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळले, तेव्हापासून बंद झाला होता. त्यांचा मुलगा अमेरिकेतून फोन करत होता पण फोन बराच वेळ बंद असल्याने मुलाने मुंबईतील मित्रांना याबाबत माहिती दिली आणि चांसोरिया यांचा शोध घेण्याची विनंती केली. मित्रांनीही तात्काळ बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करत शोध सुरू केला. पोलिसांनी चांसोरिया यांचा फोन ट्रॅक केला असता त्यांचे शेवटचे लोकेशन घाटकोपरच्या पेट्रोल पंपावर मिळाले.

ही माहिती मिळताच चांसोरिया यांचे नातेवाईक व मित्रपरिवाराने दुर्घटनास्थळी धाव घेतली. चांसोरिया दाम्पत्य बचावेल, अशी सर्वांची अपेक्षा होती. मात्र काल रात्री ही दुःखद बातमी समजल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला.

होर्डिंगखाली अडकलेल्या व्यक्तींचा शोध सोमवारपासून घाटकोपर येथे एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाकडून घेण्यात येत होता. गुरुवारी (दि. १६ मे) सकाळपर्यंत ही शोध मोहीम सुरू होती. मात्र हे मदतकार्य गुरुवारी सकाळी बंद करण्यात आले असून सध्या केवळ ढिगारा बाजूला करण्याचे काम सुरू आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केल्यानंतर मदतकार्य पूर्ण झाल्याची माहिती दिली. तसेच दिवसभर ढिगारा हटविण्याचे काम सुरू राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात, घाटकोपर येथे होर्डिंग कोसळण्याच्या घटनेनंतर गंभीर रुग्णांना नेण्यात येत होते. रुग्णालय प्रशासनाने या रुग्णांना तात्काळ तळमजल्यावर उपचार मिळावे यासाठी युद्धपातळीवर व्यवस्था केली. सर्व कर्मचार्‍यांनी एकदिलाने कामाला लागून तळमजल्यावरील एक जागा मोकळी केल्यामुळे वेगाने उपचार करणे शक्य झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #ghatkoparmishap#hoardingcollapse
Previous Post

भाजपाला कश्यासाठी हव्यात चारशे पार जागा?

Next Post

“आम्ही तुम्हाला किंमतही देत नाही,” – पुष्कर श्रोत्री

Next Post
“आम्ही तुम्हाला किंमतही देत नाही,” – पुष्कर श्रोत्री

"आम्ही तुम्हाला किंमतही देत नाही," - पुष्कर श्रोत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्मशानभूमीतून बाहेर पडली ‘आनंदलेली’ भुतं!

स्मशानभूमीतून बाहेर पडली ‘आनंदलेली’ भुतं!

August 2, 2025
‘श्यामची आई’ सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार!

‘श्यामची आई’ सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार!

August 2, 2025
मिठी नदी प्रकरणी ६५ कोटी रुपयांचा घोटाळा!

मिठी नदी प्रकरणी ६५ कोटी रुपयांचा घोटाळा!

August 2, 2025
इंडिगो विमानात एका पीडित व्यक्तीस सहप्रवाशाने कानशिलात लगावली!

इंडिगो विमानात एका पीडित व्यक्तीस सहप्रवाशाने कानशिलात लगावली!

August 2, 2025
उच्चशिक्षित महिला! आठ पुरुषांसोबत लग्न!

उच्चशिक्षित महिला! आठ पुरुषांसोबत लग्न!

August 2, 2025
पुण्यातील यवतमधील वातावरण निवळते आहे!

पुण्यातील यवतमधील वातावरण निवळते आहे!

August 2, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.