पुणे प्रतिनिधी :
दि. २१ सप्टेंबर २०२१
पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेली पीएमपीएमएल थेट शहराच्या मध्यवर्ती भागापर्यंत सेवा देते. उत्सवाच्या काळात ही सेवा रात्री उशिरापर्यंत सुरू असते. त्यासाठी पीएमपीएमएलकडून अडीचशेहून अधिक जादा बसचे नियोजन करण्यात आले होते.
प्रवाशांचा चांगला प्रतिसाद गणेशोत्सवादरम्यान पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसला मिळाला आहे. या काळात पीएमपीएमएल मधून एक कोटी २८ लाख ५६ हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे. त्यातून पीएमपीएमएलला साडेसतरा कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. पीएमपीएमएलच्या बसची संख्या यंदा कमी असताना देखील ५० लाखांनी उत्पन्नात वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. राज्यासह देशाच्या विविध भागातून पुण्याचा गणेशोत्सव पाहण्यासाठी भाविक येत असतात. शहराच्या मध्यवर्ती भागासह इतर परिसरात गणपती बाप्पाच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत देखावे पाहण्यासाठी आणि बाजारपेठांत खरेदीसाठी येणाऱ्यांची मोठी गर्दी असते. रस्त्यावर लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने कोंडीतच वेळ जातो. त्यात पार्किंगचा प्रश्नही गंभीर आहेच. त्यामुळे बहुतांश नागरिक स्वतःची वाहने घरी किंवा जवळच्या बसस्टॉप परिसरात लावून पीएमपीने प्रवास करण्यास अधिक पसंती देतात. पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेली पीएमपीएमएल थेट शहराच्या मध्यवर्ती भागापर्यंत सेवा देते. ही सेवा उत्सवाच्या काळात रात्री उशिरापर्यंत सुरू असते. त्यासाठी पीएमपीएमएलकडून अडीचशेहून अधिक जादा बसचे नियोजन करण्यात आले.
पीएमपीएमएलला त्यामुळे प्रत्येक वर्षी गणेशोत्सवात प्रवाश्यांचा चांगला प्रतिसाद असतो. यंदादेखील गणेशोत्सवासाठी पीएमपीएमएलने जादा बसचे नियोजन केले होते. दररोज साधारण १४०० ते १७०० च्या दरम्यान बस मार्गावर धावत होत्या. पीएमपीएमएलला त्यातून सरासरी दैनंदिन दीड ते १ कोटी ९० लाखांपर्यंत उत्पन्न मिळाले, तर दैनंदिन प्रवासी संख्या ही १० ते १३ लाखांच्या आसपास होती. सात ते १७ सप्टेंबर या ११ दिवसांच्या कालावधीत पीएमपीएमएलला एकूण १७ कोटी ४३ लाख ६७ हजार २१५ रुपये उत्पन्न मिळाले आहे. गेल्या वर्षी पीएमपीएमएलला १६ कोटी ९२ लाख २५ हजार ४६४ रुपये उत्पन्न मिळाले होते. म्हणजेच यंदा पीएमपीएमएलला ५१ लाख ४१ हजार रुपयांचे उत्पन्न अधिक मिळाले आहे.