नवी दिल्ली प्रतिनिधी :
दि. २४ सप्टेंबर २०२४
गौतम गंभीरने बेजेपी प्रवेशाआधी ज्या नेत्याची भेट घेतली होती त्याच नेत्याबरोबर विराट कोहलीचे फोटो व्हायरल झाले आहेत. आता विराट कोहलीसुद्धा गंभीरनंतर बीजेपीमध्ये प्रवेश करणार का, याची चर्चा सुरु झाली आहे.
गौतम गंभीर हे बीजेपीचे खासदार होते. दिल्लीत विराटनेही एका मोठ्या बीजेपीच्या नेत्याची भेट घेतल्याने आता विराट कोहली बीजेपीमध्ये प्रवेश करणार का, अशी चर्चा सुरु झाली आहे.
भारताने चेन्नईत पहिला कसोटी सामना जिंकल्यावर ते आता कानपूर येथे दुसरा कसोटी सामना खेळण्यासाठी रवाना झाले आहेत. पण भारतीय संघ कानपूरला जाण्यापूर्वी नवी दिल्लीत उतरला होता. भारतीय संघ नवी दिल्लीत उतरल्यावर बीजेपीच्या एका नेत्याने विराट कोहलीची भेट घेतली. विराट कोहली आणि या बीजेपीच्या नेत्याचे फोटो बरेच व्हायरल झाले आहेत.
गौतम गंभीर हे सध्या बीजेपीमध्येच आहेत. गंभीर यांनी एक खासदार म्हणून चांगले काम केले होते. बरेच सामाजिक उपक्रम देखील गंभीर यांनी सुरु केले. पण ते गेल्या काही वर्षांपासून क्रिकेटमध्ये परतले. गंभीर हे गेल्या वर्षी केकेआरचे मार्गदर्शक होते. केकेआरने गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी गंभीर यांची वर्णी लागली. यापूर्वी गंभीर आणि कोहली यांच्यात वाद पाहायला मिळाला होता. पण त्यांनी या वादाला भारतीय संघात आल्यावर पूर्णविराम दिला आणि आता दोघे एकत्रपणे भारतीय संघासाठी काम करताना दिसतात. आता चाहत्यांना गंभीर यांच्या वाटेवरच विराट कोहली चालत आहे का, असा प्रश्न पडला आहे. कारण ज्या बीजेपीच्या नेत्याबरोबर गंभीर यांनी फोटो काढला त्यांच्याबरोबरच विराट कोहलीला पाहण्यात आले आहे.
गौतम गंभीर आणि बीजेपीचे नेते मिथिलेश कुमार कथेरिया यांची नवी दिल्ली विमानतळावर भेट झाली होती. त्यावेळेस मिथिलेश यांनी गंभीरबरोबर फोटोही काढले. त्यानंतर आता त्याच मिथिलेश यांची विराट कोहलीबरोबर भेट झाली आहे. त्यानंतर मिथिलेश यांनी कोहलीबरोबरही फोटो काढले आणि ते सोशल मीडियावर पोस्ट केले. त्यानंतरच विराट कोहली हा बीजेपीच्या नेत्याला भेटल्याचे सर्वश्रुत झाले. त्यामुळेच आता विराट कोहली बीजेपीमध्ये प्रवेश करणार का, याबद्दल जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
सध्या विराट कोहली हा कुठल्याही पक्षामध्ये नाही. पण आता तो बीजेपीत जाणार असल्याची चर्चा या पक्षाच्या नेत्याला भेटल्यामुळे सुरु झाली आहे. मात्र याबाबतची अधिकृत माहिती अद्यापही समोर आलेली नाही. काही दिवसांवर विधानसभा निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर विराटने घेतलेली ही भेट महत्वाची असल्याचे म्हटले जात आहे.
सध्या फक्त बीजेपीच्या नेत्याची भेट विराट कोहलीने घेतली आहे, याचा अर्थ तो नक्कीच या पक्षात जाणार असा घेतला जाऊ शकत नाही हेही तितकेच खरे आहे. त्यामुळे याबाबत विराट कोहली किंवा बीजेपी काय स्पष्ट करते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.