DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

हे फेक एन्काऊंटर असेल तर पोलिसांचं डबल अभिनंदन! वरचेवर असं व्हायला पाहिजे!

शर्मिला ठाकरेंचं स्पष्ट मत.

DD News Marathi by DD News Marathi
September 25, 2024
in प्रेरणादायी, महाराष्ट्र, राजकीय
0
हे फेक एन्काऊंटर असेल तर पोलिसांचं डबल अभिनंदन! वरचेवर असं व्हायला पाहिजे!

ठाणे प्रतिनिधी :
दि. २५ सप्टेंबर

अक्षय शिंदेचं एन्काऊंटर केलेल्या पोलिसांचं शर्मिला ठाकरे यांनी अभिनंदन केलं आहे. विशेष म्हणजे त्या म्हणाल्या की, असे एन्काऊंटर वरचेवर झाले पाहिजे तेव्हाच गुन्हेगारांवर वचक बसेल.

आरोपी अक्षय शिंदेचं एन्काऊंटर करण्यात आलं, ज्याने बदलापूर चिमुकलींवर लैंगिक अत्याचार केले होते. यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी पोलिसांना शाबासकी देऊन त्यांचं कौतुक केलं. शर्मिला ठाकरे यांनी काल पोलिसांना ५१ हजार रुपयांचं रोख बक्षीस देखील जाहीर केलं, तर आज त्यांनी रुग्णालयात जाऊन पोलिसांची भेट घेतली. तसेच, त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना जो मेसेज वाचून दाखवला त्यात लिहिलं होतं, जर पोलिसांनी अक्षयचं फेक एन्काऊंटर केलं असेल तर त्यांचं डबल अभिनंदन!

एन्काऊंटर हे कसंही असलं, तरी महिलांवर इतके अत्याचार वाढले आहेत, जोपर्यंत कायद्याचा असा धाक निर्माण होत नाही, तोपर्यंत बलात्काऱ्यांवर वचक बसणार नाही. असे एन्काऊंटर वरचेवर केले पाहिजे. त्यामुळे मी स्वत: पोलिसांचं अभिनंदन करायला आली आहे, असं त्यांनी सांगितलं.

मी राज ठाकरेंची पत्नी म्हणून किंवा कुठल्याही राजकीय पक्षाच्या वतीने बोलत नाहीये. मी एक महिला म्हणून सर्व महिलांच्या बाजूने बोलतेय. दररोज येणार्‍या पेपरमधील बातम्या वाचून आमच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. इतके हिंस्त्र गुन्हे घडत आहेत, नुसता बलात्कार होत नाहीये, तर बलात्कार केल्यानंतर अत्यंत वाइटपणे हत्या केली जाते आहे, म्हणून मी महिलांच्या बाजूने बोलत आहे. आज एक महिला म्हणून मला अभिमान वाटला आणि मी त्या पोलिसांचं कौतुक करतेय. आम्हाला सुरक्षिततेची भावना जर निर्माण व्हायची असेल तर असे एन्काऊंटर केले पाहिजेत, असं रोखठोक मत त्यांनी व्यक्त केलं.

दिल्ली प्रकरणात आरोपींना सहा वर्षांनी फाशीची शिक्षा झाली होती. इतक्या निर्घृणपणे त्या मुलीला मारलं होतं, तुम्ही त्या आरोपीला त्यानंतर सहा वर्ष जगण्याचा हक्क दिला. ‘शक्ती कायदा’ आपण नुसता बोलतो, आम्हाला असा शक्ती कायदा अभिप्रेत आहे, असं म्हणत त्यांनी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरला समर्थन दिलं.

त्या मुली लहान आहेत. सहा वर्षांनी तुम्ही त्यांना कोर्टात उभं केलं तर त्यांच्या काय लक्षात राहणार आहे? की समोरचा कोण आहे? त्याने काय केलं? हे त्या सांगू शकणार आहेत का? त्या लहान आहेत. हे अश्या प्रकारे एक दोन महिन्यात निकाल लागले पाहिजेत. एक दोन महिन्यात जर कोर्टात निकाल लागले तर अतिउत्तम, नाही लागले तर हा मार्ग अधिक बरा.

ही घटना लोकशाहीला मारक नाही का? असे जेव्हा एका पत्रकाराने विचारलं, तेव्हा त्यावर शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, महिलांवरील अत्याचार हे लोकशाहीला मारक नाहीत का? ते लोकशाहीला पूरक आहेत का? महिलांवरील अत्याचार ज्या वेगाने वाढत आहेत, ते लोकशाहीला पूरक आहेत असं तुम्हाला वाटत असेल तर हे देखील लोकशाहीला पूरक आहे.

हैदराबाद येथे एका मुलीवर बलात्कार झाला होता तेव्हा चार आरोपींचं एन्काऊंटर हैदराबाद पोलिसांनी केलं होतं, तेव्हा हेच विरोधीपक्ष आता जे सकाळी बोंबलतायेत, त्यांनी त्यांच्या वृत्तपत्रात हैदराबाद पोलिसांचं कौतुक केलेलं होतं. हैदराबाद पोलिसांना वेगळा आणि महाराष्ट्र पोलिसांना वेगळा न्याय, असं कसं होऊ शकतं? तो एक बलात्कारी होता कोणी संत महात्मा नव्हता.

त्या पुढे म्हणाल्या, “माझी भूमिका जी आहे तीच राज ठाकरेंची भूमिका आहे. मी त्यांची बायको आहे. कुठल्या पुरुषाला हे आवडेल की महाराष्ट्रात बलात्कार होत आहेत? जे अत्याचार महिलांवर सुरु आहेत ते कोणालाही पटणारे नाहीत”.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AkshayShindeEncouter#RajThackeray#SharmilaThackeray
Previous Post

एकनाथ शिंदे विधानसभा निवडणुकीच्या तयारीत!

Next Post

मॅट्रिमॉनियल वेबसाइटवरून IIM बँगलोरच्या पदवीधराने केली १६ तरुणींची फसवणूक!

Next Post
मॅट्रिमॉनियल वेबसाइटवरून IIM बँगलोरच्या पदवीधराने केली १६ तरुणींची फसवणूक!

मॅट्रिमॉनियल वेबसाइटवरून IIM बँगलोरच्या पदवीधराने केली १६ तरुणींची फसवणूक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.