DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

कशामुळे अभिनेता सुशांत शेलारची अशी अवस्था ? कारण आलं समोर!

म्हणाला- 'मी बारीक झालो कारण...'

DD News Marathi by DD News Marathi
October 3, 2024
in ताज्या बातम्या, मनोरंजन, महाराष्ट्र
0
कशामुळे अभिनेता सुशांत शेलारची अशी अवस्था ? कारण आलं समोर!

मुंबई प्रतिनिधी :
दि. ०३ ऑक्टोबर २०२४

गेल्या काही दिवसांपासून ‘दुनियादारी’ फेम अभिनेता सुशांत शेलार विशेष चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर काळजी आणि त्याला कोणता भयंकर आजार झाला आहे का, अशी शंका त्याच्याविषयी चाहत्यांनी व्यक्त केली होती. ह्या चर्चेला सुरुवात होण्यामागचे कारण म्हणजे, काही दिवसांपूर्वी जेव्हा ‘धर्मवीर २’ सिनेमाच्या प्रीमियरसाठी सुशांत उपस्थित होता. तेव्हा या सोहळ्यातील त्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्यावेळी अनेकांच्या नजरेतून ही बाब सुटली नाही की सुशांतचे वजन प्रचंड प्रमाणात, कमालीचे घटले आहे. अखेर याविषयी सुशांतचे स्पष्टीकरण समोर आल्यानंतर चाहत्यांचा जीव भांड्यात पडला.

सुशांतला ‘कोणताही आजार झालेला नाही’ असे त्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणातून समजल्यावर चाहते निश्चिंत झाले. अभिनेता सुशांत शेलारने प्रसारित केलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याच्याविषयी काळजी व्यक्त करणाऱ्या प्रेक्षकांचे आभार मानले. तो म्हणाला की, ‘सुदैवाने, स्वामींच्या कृपेने मला कोणताही आजार झालेला नाही. “रानटी” नावाचा माझा सिनेमा, जो समित कक्कडने दिग्दर्शित केला आहे, २२ नोव्हेंबरला प्रदर्शित होतो आहे. त्या सिनेमासाठी एक आयुर्वेदिक डॉक्टर जाधव यांच्या सल्ल्याने मी बारीक झालो आहे.’ अशी प्रतिक्रिया सुशांतने दिली आहे. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही हा व्हिडिओ शेअर केला.

तो पुढे म्हणाला, “काही महिन्यांपूर्वी मला वारंवार फूड इन्फेक्शन होत होतं. त्यामुळे माझं वजन आणखी घटलं.” सुशांत पुढे म्हणाला की, याकरता जेव्हा त्याने फुड इन्टॉलरन्स तपासणी केली, तेव्हा त्याला ग्लुटन अ‍ॅलर्जी असल्याचे आढळून आले. पाव, बटाटा , ब्रेड, अंडी अशा काही पदार्थांची त्याला अ‍ॅलर्जी झाली आहे आणि परिणामी गेल्या २-३ महिन्यात वारंवार फुड इन्फेक्शन होत होते. यामुळे वजन घटले आणि थोडा त्रास झाला.

अनेक चाहत्यांचा जीव सुशांतने हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर भांड्यात पडला. त्याने पुढे असे म्हटले की, ‘माझी तब्येत आता छान आहे. स्वामींच्या कृपेने कोणताही भयंकर आजार झालेला नाही. माझ्याविषयी तुम्ही जे प्रेम दाखवले त्याकरता मनापासून आभार. माझं वजन जसं समाजात वाढत आहे, लवकरच तसं शारिरीक वजनही वाढेल.’ सुशांतच्या आगामी सिनेमा ‘रानटी’मध्ये अभिनेता शरद केळकर मुख्य भूमिकेत आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #RanatiMarathiMovie#SushantShelar
Previous Post

२४ तास हेल्पलाईन नंबर करणार मदत – ‘एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह’

Next Post

नालासोपाऱ्यातील ४१ बेकायदेशीर इमारतींवर पडणार हातोडा, उच्च न्यायालयाचे आदेश!

Next Post
नालासोपाऱ्यातील ४१ बेकायदेशीर इमारतींवर पडणार हातोडा, उच्च न्यायालयाचे आदेश!

नालासोपाऱ्यातील ४१ बेकायदेशीर इमारतींवर पडणार हातोडा, उच्च न्यायालयाचे आदेश!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा स्वतःच्या आमदारावर संताप!

फडणवीसांचा स्वतःच्या आमदारावर संताप!

December 10, 2025
“धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, नाहीतर राज्यव्यापी आंदोलन!”

“धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, नाहीतर राज्यव्यापी आंदोलन!”

December 10, 2025
जर्मन मेट्रोत सेलिब्रिटीच्या शेजारी बसला आणि नशीब फळफळले!

जर्मन मेट्रोत सेलिब्रिटीच्या शेजारी बसला आणि नशीब फळफळले!

December 10, 2025
महाराष्ट्रात EVM ची सुरक्षा पुरेशी वाटत नाही?

महाराष्ट्रात EVM ची सुरक्षा पुरेशी वाटत नाही?

December 10, 2025
बायकोचा फोन आला अन् तरुणाने आत्महत्त्या केली!

बायकोचा फोन आला अन् तरुणाने आत्महत्त्या केली!

December 9, 2025
नोकरी मिळणार या आशेने लग्न केलेल्या किरणची आत्महत्त्या!

नोकरी मिळणार या आशेने लग्न केलेल्या किरणची आत्महत्त्या!

December 9, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.