डीडी न्यूज प्रतिनिधी :
दि. ११ ऑक्टोबर २०२४
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी कसोटीला भारताचा नियमित कसोटी कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सामन्याला मुकणार आहे. संघासाठी हा मोठा धक्का असताना, अशा परिस्थितीत यशस्वी जैस्वाल याच्यासोबत कोण सलामीला येईल? हा प्रश्नही उपस्थित झाला आहे. ऋतुराज गायकवाड आणि अभिमन्यू ईश्वरन हे पर्याय लगेच डोळ्यांसमोर दिसतात, पण भारताचे माजी निवडकर्ते जतिन परांजपे यांनी वेगळेच मत नोंदवले आहे. त्यांनी युवा पृथ्वी शॉचे समर्थन केले आहे. परांजपे यांच्या मते, पृथ्वीच्या आक्रमण शैलीचा संघाला फायदा होईल आणि ही गोष्ट जयस्वाललाही चांगलीच कौतुक मानवेल. परांजपे यांनी एका अग्रगण्य दैनिकाशी बोलताना हेही निदर्शनास आणून दिले की, शुभमन गिल हा बॅकअप सलामीवीर म्हणून दुसरा पर्याय असू शकतो, परंतु तो क्रमांक 3 वर चांगला स्थिरावत असल्याने – व्यवस्थापनाला त्याच्याशी छेडछाड करणे आवडणार नाही. पण याआधी पृथ्वीला डोमेस्टिक सर्किटमध्ये आपली योग्यता सिद्ध करण्याची गरज असल्याचेही परांजपे म्हणाले.