नवी दिल्ली प्रतिनिधी :
दि. १० डिसेंबर २०२४
रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर म्हणून संजय मल्होत्रा यांची नेमणूक झाली आहे. कॅबिनेटच्या अपॉइंटमेंट कमिटीने त्यास मंजूरी दिली आहे. श्री. संजय मल्होत्रा हे उद्या ११ डिसेंबरपासून आपला कार्यभार सांभाळणार आहेत. पुढील तीन वर्षांसाठी ते या पदावर कार्यरत राहातील. अपॉइंटमेंट कमिटीचे सेक्रेटरी श्री. मनीष सक्सेना यांनी तसे पत्र जारी केले आहे.
बातमी नक्की शेअर करा