DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

ट्रम्प यांच्या सरकारमधील या भारतीय महिलेमुळे भल्या भल्यांना फुटतो घाम!

कोण आहेत या भारतीय महिला? 

DD News Marathi by DD News Marathi
December 11, 2024
in ताज्या बातम्या, देश-विदेश, प्रेरणादायी
0
ट्रम्प यांच्या सरकारमधील या भारतीय महिलेमुळे भल्या भल्यांना फुटतो घाम!

डीडी न्यूज प्रतिनिधी
दि. ११ डिसेंबर २०२४

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली जात आहे. ट्रम्प यांच्या सरकारमध्ये अनेक हुशार लोकांचा समावेश केला जात आहे. आता अशी माहिती मिळते आहे की, त्यांनी त्यांच्या सर्वोच्च कायदेशीर पदासाठी हरमीत ढिल्लन यांची निवड केली आहे.

‘सहाय्यक ऍटर्नी जनरल’ पदासाठी हरमीत यांनी निवड करण्यात आलीये. ढिल्लन यांचा जन्म चंदीगडमध्ये झाला असून त्या न्याय विभागात नागरी हक्कांसाठी सेवा पुरवतात. ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. हरमीत ढिल्लन या मूळच्या भारतीय-अमेरिकन आहेत. ट्रम्प यांनी त्यांच्या आधी डॉ जय भट्टाचार्य, विवेक रामास्वामी आणि कश्यप पटेल यांचाही आपल्या मंत्रिमंडळात समावेश केला आहे. ढिल्लन या प्रसिद्ध वकील आहेत. ज्या नागरी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी लढतात. ढिल्लन यांची फी देखील इतकी आहे की त्यावरुन त्यांची योग्यता कळते.

ट्रम्प आणि हरमीत ढिल्लन यांची आधीपासूनच ओळख आहे. कारण 2023 मध्ये, डोनाल्ड ट्रम्प यांनी कायदेशीर गोष्टींसाठी $50 दशलक्ष खर्च केले होते. ज्यात चार वकिलांना समावेश होता. या वकिलांमध्ये हरमीत ढिल्लन यांचेही नाव होते. यावेळी त्यांना पेमेंट म्हणून 46.1 लाख डॉलर (सुमारे 40 कोटी रुपये) मिळाले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ट्रम्प यांच्यावर 91 गुन्हे नोंद आहेत. 54 वर्षीय ढिल्लन यांचा जन्म चंदीगडमध्ये झालाय. त्या लहान असताना त्यांचे आई-वडील अमेरिकेत स्थायिक झाले होते. हरमीत यांनी नॉर्थ कॅरोलिना स्कूल ऑफ सायन्स अँड मॅथेमॅटिक्समधून उच्च माध्यमिक शिक्षण घेतलंय. त्यांनी डार्टमाउथ कॉलेजमधून शास्त्रीय साहित्यात बीए आणि व्हर्जिनिया विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळवली आहे.

1993 मध्ये हरमीत ढिल्लन यांनी कोर्टात लिपिक म्हणून काम सुरू केले. 1994 ते 1998 दरम्यान त्यांनी शेरमन आणि स्टर्लिंग येथे सहयोगी म्हणून काम केले. 1998 ते 2002 मध्ये त्यांनी लॉ फर्ममध्ये काम केले. 2003 ते 2004 पर्यंत, ढिल्लन यांनी ऑरिक, हॅरिंग्टन आणि सटक्लिफ येथे सल्लागार म्हणून काम केले 2004 मध्ये त्यांनी ढिल्लन लॉ ग्रुप इंकोर्पोरेशनची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांना वकिली सुरु केली. व्यवसाय खटला, बौद्धिक संपदा खटला, संस्थापक आणि कार्यकारी विवाद, रोजगार खटला, बदनामी, SLAPP विरोधी, प्रथम दुरुस्ती, इंटरनेट गोपनीयता आणि ग्राहक वर्ग कारवाई प्रकरणे अशा वेगवेगळ्या खटल्यासाठी त्यांनी वकील म्हणून काम केले. ढिल्लन यांनी मागच्या वर्षी रिपब्लिकन नॅशनल कमिटीच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली पण त्यांना यश आले नाही. आता त्यांची नियुक्ती ट्रम्प प्रशासनातील भारतीय-अमेरिकन समुदायाचा वाढता प्रभाव दर्शवतेय. ढिल्लन यांचे कौशल्य आणि त्यांचा अनुभव त्यांना या महत्त्वाच्या पदापर्यंत घेऊन आले आहेत.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AssistantAttorneyGeneral#DonaldTrump#HarmeetDhillon#USA
Previous Post

विधानसभेच्या निकालावर झाला मोठा खुलासा!

Next Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून डॉ. माधव गाडगीळ यांचे युएनईपीच्या पुरस्कारासाठी अभिनंदन!

Next Post
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून डॉ. माधव गाडगीळ यांचे युएनईपीच्या पुरस्कारासाठी अभिनंदन!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून डॉ. माधव गाडगीळ यांचे युएनईपीच्या पुरस्कारासाठी अभिनंदन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.