DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

चेंगाराचेंगरी आणि मृत्यू प्रकरणात अल्लू अर्जुनला १४ दिवसांची कोठडी!

हैदराबाद थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत महिलेचा झाला होता मृत्यू.

DD News Marathi by DD News Marathi
December 13, 2024
in ताज्या बातम्या, मनोरंजन
0
चेंगाराचेंगरी आणि मृत्यू प्रकरणात अल्लू अर्जुनला १४ दिवसांची कोठडी!

हैदराबाद प्रतिनिधी :
दि. १३ जानेवारी २०२४

४ डिसेंबर २०२४ रोजी ‘पुष्पा 2: द रुल’च्या प्रीमियर शोच्या स्क्रिनिंगदरम्यान, हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी अल्लू अर्जुन आणि थिएटर व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हैदराबाद पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी अल्लू अर्जुनने तेलंगणा उच्च न्यायालयातही धाव घेतली होती. पण याप्रकरणी अल्लू अर्जुनला आज अटक करण्यात आली आहे. हैदराबादच्या नामपल्ली न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर फक्त दाक्षिणात्य सिनेसृष्टीच नाही तर बॉलिवूडमध्येही खळबळ उडाली आहे. अभिनेत्याच्या चाहत्यांना धक्का बसला असून ते त्याच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत आहेत. अशातच आता बॉलिवूड अभिनेता वरुण धवननेही अल्लू अर्जुनच्या बाजूने वक्तव्य केलं आहे. या प्रकरणासंबंधी कोणा एका व्यक्तीला दोष देऊन चालणार नाही, असं वरुणचं म्हणणं आहे.

सध्या वरुण धवन त्याचा आगामी सिनेमा ‘बेबी जॉन’ च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. नुकत्याच एका प्रमोशनदरम्यान त्याने अल्लू अर्जुनच्या अटकेबद्दल चर्चा केली. वरुण म्हणाला की, फक्त अभिनेत्याला स्वतःची सुरक्षा किंवा इतर गोष्टींसाठी जबाबदार धरले जाऊ शकत नाही. कारण त्याच्या आजूबाजूला इतर अनेक लोक असतात. घडलेली दुर्घटना अत्यंत वेदनादायी आहे. मी त्यांच्या कुटुंबाचं सांत्वन करेन. पण या प्रकरणी तुम्ही कोणत्याही एका व्यक्तीला दोष देऊ शकत नाही.’

अल्लू अर्जन हा साऊथचा सुपरस्टार अभिनेता असून तो सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा 2’ या चित्रपटाच्या यशामुळे चर्चेत आहेत. हा चित्रपट ५ डिसेंबर २०२४ ला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने अवघ्या काही दिवसांत बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केलीये. ‘पुष्पा 2’ ने ८ दिवसांत १०६० कोटींचा आकडा पार केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटाने १०६० कोटींचा आकडा गाठल्याचं मानलं जात आहे. परदेशात चित्रपटाची कमाई आता २०० कोटींवर जाणार आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AlluArjun#custody#Pushpa2
Previous Post

शपथविधीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार मोदींच्या भेटीला!

Next Post

अल्लू अर्जुनला कोर्टाकडून जामीन मंजूर तर मृत महिलेच्या पतीने घेतला मोठा निर्णय!

Next Post
अल्लू अर्जुनला कोर्टाकडून जामीन मंजूर तर मृत महिलेच्या पतीने घेतला मोठा निर्णय!

अल्लू अर्जुनला कोर्टाकडून जामीन मंजूर तर मृत महिलेच्या पतीने घेतला मोठा निर्णय!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्मशानभूमीतून बाहेर पडली ‘आनंदलेली’ भुतं!

स्मशानभूमीतून बाहेर पडली ‘आनंदलेली’ भुतं!

August 2, 2025
‘श्यामची आई’ सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार!

‘श्यामची आई’ सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार!

August 2, 2025
मिठी नदी प्रकरणी ६५ कोटी रुपयांचा घोटाळा!

मिठी नदी प्रकरणी ६५ कोटी रुपयांचा घोटाळा!

August 2, 2025
इंडिगो विमानात एका पीडित व्यक्तीस सहप्रवाशाने कानशिलात लगावली!

इंडिगो विमानात एका पीडित व्यक्तीस सहप्रवाशाने कानशिलात लगावली!

August 2, 2025
उच्चशिक्षित महिला! आठ पुरुषांसोबत लग्न!

उच्चशिक्षित महिला! आठ पुरुषांसोबत लग्न!

August 2, 2025
पुण्यातील यवतमधील वातावरण निवळते आहे!

पुण्यातील यवतमधील वातावरण निवळते आहे!

August 2, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.