DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंची लायकी काढली!

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोलले होते ठाकरे.

DD News Marathi by DD News Marathi
December 14, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंची लायकी काढली!

अमरावती प्रतिनिधी :
दि. १४ डिसेंबर २०२४

“बांगलादेशमध्ये अन्याय झाला, त्या मोर्चांमध्ये ठाकरे कुठे होते? आमच्यावर कारवाई केली तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? आम्ही हनुमान चालीसा म्हटलं म्हणून आम्हाला जेलमध्ये टाकलं. उद्धव ठाकरेंनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. हिंदुत्व हे सत्तेसाठी खुंटीवर टांगणारे तुम्ही, ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोलायची लायकी नाही. उद्धव ठाकरे हे टोमणा देणारे जनाब आहेत”, असं म्हणत भाजप नेत्या नवनीत राणा यांनी शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

त्याचदरम्यान, ”ज्यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाची कास सोडली आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले ते उद्धव ठाकरे आज हिंदूंच्या रक्षणाबद्दल बोलत आहेत. उद्धव ठाकरे तुमचं हिंदू प्रेम किती बेगडी होतं हे तुमच्या अडीच वर्षांच्या सत्तेच्या काळात जनतेनं बघितलं. पालघरमध्ये झालेलं साधूंचं हत्याकांड, त्यावेळची तुमची तटस्थता आणि तुमची हिंदूविरोधी भूमिका महाराष्ट्रानं बघितली आहे. बांगलादेशमधील हिंदूच्या पाठीशी भाजप उभी आहे. त्याचसाठी केंद्र सरकारनं ‘नागरिकत्व दुरूस्ती विधेयक’ मंजूर केलं. त्यावेळी तुम्ही मात्र काँग्रेसला घाबरून राज्यसभेत बोटचेपी भूमिका घेतली होती, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्वीटरवरुन (एक्स) उद्धव ठाकरेंना धारेवर धरलं आहे.

या आधी ठाकरेंनी भाजपवर आणि पर्यायाने मोदींवर टीका केली होती. “मुंबईमधील दादरमध्ये रेल्वे स्टेशनजवळ गेल्या ८० वर्षांपासून असलेल्या श्री.हनुमानाचं मंदिर पाडण्याची नोटीस भाजपने पाठवली आहे. विशेष बाब म्हणजे ते मंदिर एका हमालाने मेहनत करुन बांधलं आहे. ती पाठवलेली नोटीस माझ्याकडे आहे. त्या नोटीसीमध्ये लिहिलंय की, तुम्ही रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण केलंय, ८० वर्षापूर्वीचं मंदिर भाजप पाडायला निघाले आहे. मग भाजपचं हिंदुत्व कुठे आहे?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला होता.

“बंगलादेशमध्ये सातत्याने हिंदूंवर हल्ले सुरु आहेत, तिथे इस्कॉनचं मंदिर जाळलं आहे, तरी आपण गप्प आहोत. त्या मंदिरातील पुजारी…त्यांना अटक झाली, तरीही आपण गप्प आहोत. हिंदूंवर रोज अत्याचार होताय, तरीसुद्धा आपण गप्प आहोत. मग आपले विश्वगुरु हे अत्याचार फक्त पाहत का बसले आहेत?” असा सवाल ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना यावेळी केला होता ”जसं आपण एका फोनवर युक्रेनचं युद्ध थांबवलं होतं. तसंच बांगलादेशमध्ये हिंदूंवर जे अत्याचार होत आहेत, त्याबद्दल आपण काहीतरी पावलं उचलली पाहिजेत. इथे फक्त बटेंगे, कटेंगे करुन उपयोग नाहीय. जिथे काही नाहीय, तिथे छाती फुगवून दाखवण्यात काही अर्थ नाहीय”, असा टोला देखील त्यांनी मोदींना लगावला होता.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #bangladesh#navaneetrana#UddhavThackeray
Previous Post

शरद पवारांचे पंतप्रधानांना साहित्य संमेलनाचे निमंत्रण!

Next Post

सुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन काळाच्या पडद्याआड!

Next Post
सुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन काळाच्या पडद्याआड!

सुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन काळाच्या पडद्याआड!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

October 17, 2025
राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

October 17, 2025
‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

October 17, 2025
कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

October 16, 2025
प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

October 16, 2025
मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

October 16, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.