मुंबई प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी
दि.२७ मे २०२१
महाराष्ट्रातील कोरोनाच्या दुस-या लाटे दरम्यान लावण्यात आलेला लॅाकडाऊन पुढे ही कायम ठेवण्याचा निर्णय आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत सरकारतर्फ घेण्यात आला आहे. मात्र,सध्याच्या लॅाकडाऊन दरम्यान असलेले काही नियम कमी करण्यात येणार आहेत. ही एक समाधानाची बाब आहे. त्यामूळे १ जुननंतर ही लॅाकडाऊन कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तेंव्हा, राज्यात लॉकडाऊन आणखी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून काही ठिकाणी नियम शिथिल करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तसेच, सरसकट लॅाकडाऊन उठवला जाणार नाही. याविषयीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री टास्क फोर्स व आरोग्य विभागाशी बोलून घेतील अशी माहिती ही त्यांनी दिली आहे.
कोरोनाच्या नव्या व्हायरसच्या फैलावा मूळे लॅाकडाऊन पुर्णपणे हटविणे योग्य राहणार नसल्याचे ही त्यांनी सांगितले. विदेशात नव्या लसी बाजारात आल्या आहेत, मात्र कोविशील्ड, कोव्हॅक्सीन व स्पुटनिक या लसींनाच केंद्र सरकारने परवानगी दिली असल्याने इतर लसी खरेदी करण्याबाबत अडचणी निर्माण होत आहेत असे ही टोपे म्हणाले आहेत.
लॅाकडाऊन कायमः दिलासाच नाहीच.
नव्या अटींसह आता जवळपास लॅाकडाऊन कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामूळे १ जुननंतर लॅाकडाऊन उठेल या आशेने डोळे लावून बसलेल्या सगळ्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे. विशेषतः व्यापारी वर्ग व विद्यायार्थ्यांचे यात मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. आता, पुढे सरकार कोणकोणते नियम शिथिल केले जाणार आहेत हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
#DDNewsMarathi
#RajeshTope
#MahavikasAghadi
#MahaGovt.
#Maharashtra