DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

उपाशीपोटी झोपलेल्या चिमुकल्यांना डंपरने चिरडले!

अमरावतीहून आले होते कामगार पोट भरण्यासाठी.

DD News Marathi by DD News Marathi
December 23, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
उपाशीपोटी झोपलेल्या चिमुकल्यांना डंपरने चिरडले!

पुणे प्रतिनिधी :
दि. २३ डिसेंबर २०२४

तुम्ही गरीब असाल, तुमच्या डोक्यावर छत नसेल आणि धरती हे अंथरूण तर आकाश हेच पांघरूण असेल तर तुम्ही किड्या मुंग्यासारखे चिरडून मेलात तरीही त्याचं कुणालाच काही देणंघेणं नाही. असं वाटण्याचं कारण म्हणजे वाघोली येथील अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या आणि काही जखमी अवस्थेत असलेल्या मजुरांची परिस्थिती. वाघोली येथील केसनंद इथं पोटाची खळगी भरण्यासाठी अमरावतीहून आलेल्या आणि दमून भागून रस्त्याच्या कडेला झोपलेल्या कामगारांना काळ बनून आलेल्या मद्यधुंद डंपर चालकाने अक्षरशः चिरडलं आहे.

यात दोन चिमुकल्यांसह तिघांनी उपाशीपोटीच जगाचा निरोप घेतला तर अजूनही सहाजणांची मृत्यूशी झुंज सुरु आहे. अंगावर काटा आणणाऱ्या या घटना वारंवार घडत आहेत. गरिबांना जगण्याचा अधिकारच नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन वेळचं पोटभर अन्नही नशिबात नसणाऱ्या, मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या त्या आपघातग्रस्त मजुरांना समाज आणि सरकारकडून मदत आणि न्याय मिळणार का? असा प्रश्न सकाळी सकाळी हाती आलेल्या मन सुन्न करणाऱ्या या बातमीने निर्माण केला आहे.

या घटनेमुळे मृतांच्या कुटुंबियांमध्ये आक्रोश पसरला आहे. या घटनेमध्ये नेमकी चूक कोणाची हा सवाल आता उपस्थित झाला आहे. आपलं घरदार सोडून पोटापाण्यासाठी शहरात आलेल्या गरिब मजुरांची? जे दिवसभर कष्ट करुन दमून-भागून रस्त्याच्या कडेला झोपले होते? की, मद्यधुंद अवस्थेत असलेल्या डंपर चालकाची जो उन्मत्त अवस्थेत वाहन चालवत होता? या प्रश्नाचं उत्तर बहुधा आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. परंतु ही वेळ फक्त ऊहापोह करण्याची नसून समाज म्हणून आपली आणि जबाबदारी म्हणून सरकारने पीडीतांना मदत करण्याची आहे.

ज्या रोजगारासाठी हे कामगार पुण्यात आले होते तो रोजगार त्यांना अमरावतीतच उपलब्ध झाला असता तर कदाचित आजची ही दुर्घटना घडली नसती, अशी चर्चा होताना दिसत आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #dumperkillskids#kesnandphata#wagholiaccident
Previous Post

राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार?

Next Post

पंतप्रधान मोदींना मिळाला कुवेतचा सर्वोच्च नागरी सन्मान, ‘द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर’!

Next Post
पंतप्रधान मोदींना मिळाला कुवेतचा सर्वोच्च नागरी सन्मान, ‘द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर’!

पंतप्रधान मोदींना मिळाला कुवेतचा सर्वोच्च नागरी सन्मान, 'द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर'!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा स्वतःच्या आमदारावर संताप!

फडणवीसांचा स्वतःच्या आमदारावर संताप!

December 10, 2025
“धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, नाहीतर राज्यव्यापी आंदोलन!”

“धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, नाहीतर राज्यव्यापी आंदोलन!”

December 10, 2025
जर्मन मेट्रोत सेलिब्रिटीच्या शेजारी बसला आणि नशीब फळफळले!

जर्मन मेट्रोत सेलिब्रिटीच्या शेजारी बसला आणि नशीब फळफळले!

December 10, 2025
महाराष्ट्रात EVM ची सुरक्षा पुरेशी वाटत नाही?

महाराष्ट्रात EVM ची सुरक्षा पुरेशी वाटत नाही?

December 10, 2025
बायकोचा फोन आला अन् तरुणाने आत्महत्त्या केली!

बायकोचा फोन आला अन् तरुणाने आत्महत्त्या केली!

December 9, 2025
नोकरी मिळणार या आशेने लग्न केलेल्या किरणची आत्महत्त्या!

नोकरी मिळणार या आशेने लग्न केलेल्या किरणची आत्महत्त्या!

December 9, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.