DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

पुण्यात महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटात होणार राजकीय भूकंप?

पडद्यामागे बरंच काही घडतंय.

DD News Marathi by DD News Marathi
December 23, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
पुण्यात महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटात होणार राजकीय भूकंप?

पुणे प्रतिनिधी :
दि. २३ डिसेंबर २०२४

लोकसभा निवडणुकीत जोरदार यश संपादन केल्यानंतर विधानसभा निवडणुकीत देखील अशाच कामगिरीची महाविकास आघाडीला अपेक्षा होती. मात्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला या पराभवातून बाहेर येत आता महाविकास आघाडीतील पक्षांनी पक्ष संघटना बांधणीवर भर देत येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीला सामोरे जाण्याचा चंग बांधला आहे. यासाठीच शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुण्यामध्ये कार्यकर्त्यांची एक बैठक घेतली. मात्र या बैठकीला माजी नगरसेवकांनी मारलेली दांडी हा चर्चेचा विषय ठरला आहे.

संजय राऊत यांनी मुंबईत महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय स्वतःच केल्यानंतर पुण्यात मात्र कार्यकर्त्यांचा विचार घेऊनच निर्णय घेऊ असं स्पष्ट केलं होतं आणि त्यानंतर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर ठाकरे सेनेचे शिलेदार पालिका निवडणुकी बाबत काहीसे संभ्रमात असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पूर्वी शिवसेना ठाकरे गटाला धक्के बसण्याची शक्यता आहे. कारण संजय राऊत यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये ठाकरे गटाचे सर्वचे सर्व माजी नगरसेवक हे अनुपस्थित राहिल्याने ही चर्चा आता सुरू झाली आहे.

गेल्या महापालिका निवडणुकीत एकत्रित शिवसेनेने पुण्यात दहा ठिकाणी विजय मिळवला होता. त्यानंतर शिवसेनेच्या फुटीचा सर्वात कमी फटका हा पुणे शहरात बसला होता. कारण एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यावेळेस फक्त एकच नगरसेवक गेला होता. तर, लोकसभा निवडणुकी वेळी शिवसेनेचे माजी नगरसेवक असलेल्या अविनाश साळवे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे सद्य परिस्थितीला आठ माजी नगरसेवक हे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षा सोबत आहेत. हे आठही माजी नगरसेवक संजय राऊत यांच्या बैठकीला उपस्थित नव्हते. त्यामुळे शिवसेना फुटल्यानंतर जे धक्के उद्धव ठाकरे यांना पुण्यात बसले नव्हते ते महापालिका निवडणुकीच्या तोंडावर बसणार का याची चर्चा आता सुरू झाली आहे.

दरम्यान दुसरीकडे, या बैठकीबाबत निरोप आदल्या दिवशी सायंकाळी अचानक मिळाल्याने आणि बैठकीच्या दिवशीचा प्रोग्रॅम आधीच फिक्स झाल्याने बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही असं काही नगरसेवकांनी सांगितल आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #EknathShinde#shivasenaubt
Previous Post

‘त्या’ पुन्हा पालकमंत्री होणार?

Next Post

सुप्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं निधन!

Next Post
सुप्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं निधन!

सुप्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं निधन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जर्मन मेट्रोत सेलिब्रिटीच्या शेजारी बसला आणि नशीब फळफळले!

जर्मन मेट्रोत सेलिब्रिटीच्या शेजारी बसला आणि नशीब फळफळले!

December 10, 2025
महाराष्ट्रात EVM ची सुरक्षा पुरेशी वाटत नाही?

महाराष्ट्रात EVM ची सुरक्षा पुरेशी वाटत नाही?

December 10, 2025
बायकोचा फोन आला अन् तरुणाने आत्महत्त्या केली!

बायकोचा फोन आला अन् तरुणाने आत्महत्त्या केली!

December 9, 2025
नोकरी मिळणार या आशेने लग्न केलेल्या किरणची आत्महत्त्या!

नोकरी मिळणार या आशेने लग्न केलेल्या किरणची आत्महत्त्या!

December 9, 2025
महायुतीत महाकलह? कल्याण-पश्चिमेत संघर्ष चिघळला!

महायुतीत महाकलह? कल्याण-पश्चिमेत संघर्ष चिघळला!

December 9, 2025
वेगळ्या विदर्भाचा मुद्दा पुन्हा तापला!

वेगळ्या विदर्भाचा मुद्दा पुन्हा तापला!

December 9, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.