DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

सुप्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं निधन!

समांतर सिनेमा जगणारा प्रतिभावान दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड.

DD News Marathi by DD News Marathi
December 24, 2024
in ताज्या बातम्या, मनोरंजन
0
सुप्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं निधन!

डीडी न्यूज प्रतिनिधी :
दि. २४ डिसेंबर २०२४

‘मंथन’, ‘अंकुर’, ‘निशांत’, ‘भूमिका’ अशा अनेक समांतर सिनेमांचे निर्माते व दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे निधन झाले आहे. भारतीय सिनेसृष्टीत महत्त्वाचं योगदान देणारे श्याम बेनेगल यांनी काल २३ डिसेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांची मुलगी पिया बेनेगल हिने यासंदर्भात माहिती दिली आहे.

श्याम बेनेगल ९० वर्षांचे होते. काल संध्याकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला असं त्यांच्या मुलीने सांगितलं. पिया बेनेगलने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई सेंट्रल येथील वोकार्ट हॉस्पिटलमध्ये आज सायंकाळी श्याम बेनेगल यांची प्राणज्योत मालवली. श्याम बेनेगल बऱ्याच काळापासून क्रोनिक किडनीच्या समस्येने ग्रस्त होते. ते या आजाराच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचले होते. आज उपचारादरम्यान रुग्णालयात त्यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्काराबद्दल लवकरच निर्णय घेतला जाईल.

समांतर सिनेमा हा श्याम बेनेगल यांचा श्वास होता. ‘अंकुर’, ‘निशांत’, ‘मंथन’, ‘भूमिका’, ‘जुनून’ हे आणि असे अनेक चित्रपट त्यांनी दिले. ‘अंकुर’मुळे हिंदी सिनेसृष्टीला शबाना आझमी नावाची अभिनेत्री मिळाली. समांतर सिनेमा दिग्दर्शित करण्यात त्यांचं खूप मोठं योगदान होतं. ‘अंकुर’ या त्यांच्या पहिल्यावहिल्या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. तसंच ‘निशांत’, ‘मंथन’, ‘जुनून’, ‘आरोहण’ या चित्रपटांनाही राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आले आहेत. ‘महाभारत’ या संकल्पनेवर त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘कलयुग’ हा सिनेमा आजही सिनेसृष्टीतला मास्टरपीस मानला जातो. ‘सरदारी बेगम’ हा त्यांचा उर्दू सिनेमाही अनेक कारणांनी चर्चेत राहिला. तर ‘झुबैदा’ हा सिनेमाही चर्चेत होता. ‘नेताजी सुभाषचंद्र बोस द फरगॉटन हिरो’ आणि ‘वेल डन अब्बा’ हे त्यांचे अलिकडचे चर्चेत राहिलेले चित्रपट आहेत. समांतर सिनेमाशी श्याम बेनेगल यांची नाळ जोडली गेली होती. त्यांच्या चित्रपटांमधून अनंत नाग, नसीरुद्दीन शाह, ओम पुरी, शबाना आझमी, स्मिता पाटील हे कलाकार घडले. एका मनस्वी दिग्दर्शकाने आज अखेरचा श्वास घेतला आहे. समांतर सिनेमाचं युग पोरकं झाल्याची भावना आज प्रत्येकाच्या मनात आहे.

श्याम बेनेगल यांनी समांतर सिनेमांच्या माध्यमातून भारतीय चित्रपटसृष्टीत मोठं योगदान दिलं. त्यांना त्यांच्या सिनेमांसाठी प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तसेच त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत तब्बल १८ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळवले होते. त्यांना १९७६ मध्ये पद्मश्री आणि नंतर १९९१ मध्ये भारताचा तिसरा-सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं होतं.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #ankur#artfilm#shyambenegal
Previous Post

पुण्यात महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटात होणार राजकीय भूकंप?

Next Post

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट!

Next Post
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट!

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा स्वतःच्या आमदारावर संताप!

फडणवीसांचा स्वतःच्या आमदारावर संताप!

December 10, 2025
“धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, नाहीतर राज्यव्यापी आंदोलन!”

“धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, नाहीतर राज्यव्यापी आंदोलन!”

December 10, 2025
जर्मन मेट्रोत सेलिब्रिटीच्या शेजारी बसला आणि नशीब फळफळले!

जर्मन मेट्रोत सेलिब्रिटीच्या शेजारी बसला आणि नशीब फळफळले!

December 10, 2025
महाराष्ट्रात EVM ची सुरक्षा पुरेशी वाटत नाही?

महाराष्ट्रात EVM ची सुरक्षा पुरेशी वाटत नाही?

December 10, 2025
बायकोचा फोन आला अन् तरुणाने आत्महत्त्या केली!

बायकोचा फोन आला अन् तरुणाने आत्महत्त्या केली!

December 9, 2025
नोकरी मिळणार या आशेने लग्न केलेल्या किरणची आत्महत्त्या!

नोकरी मिळणार या आशेने लग्न केलेल्या किरणची आत्महत्त्या!

December 9, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.