DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

‘संतोष देशमुख हत्याकांडातील फरार आरोपींचे मृतदेह सापडले?’

दमानियांचा खळबळजनक दावा पोलिसांनी खोडून काढला.

DD News Marathi by DD News Marathi
December 30, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
‘संतोष देशमुख हत्याकांडातील फरार आरोपींचे मृतदेह सापडले?’

बीड प्रतिनिधी :
दि. ३० डिसेंबर २०२४

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात अंजली दमानिया यांनी खळबळजनक दावा केला होता. या प्रकरणातील तीन फरार आरोपींचा मृतदेह कर्नाटक बॉर्डरवरील मार्गावर सापडल्याची माहिती मला एका व्यक्तीने व्हाईस मेसेज करुन पाठवली, असा दावा त्यांनी केला. परंतु या प्रकरणात आता पोलिसांनी तपास करुन मोठा खुलासा केला आहे.

संतोष देशमुख हत्याकांडाप्रकरणी अंजली दमानिया यांचा दावा आता फोल ठरला आहे. व्हॉईस मेसेजचा पुरावा देऊन दमानियांनी संतोष देशमुखांच्या हत्येतील फरार असलेल्या तीन आरोपींचा मृतदेह सापडला असल्याची माहिती देत पोलिसांकडे तक्रार केली होती. परंतु कर्नाटक सीमेवरील बसवकल्याण येथे असे कोणतेही मृतदेह सापडले नसल्याचा मोठा खुलासा पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी म्हटले की, ज्या व्यक्तीने व्हॉईस मेसेज केला होता तो दारुच्या नशेमध्ये असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

पोलीस अधीक्षक कार्यालयाने प्रसिद्धीपत्रक काढून दमानियांचा दावा खोडून काढला आहे. प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले की, मस्साजोग, बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अंजली दमानिया यांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर जो व्हाईस मेसेज आला, की बसवेश्वर कल्याणला तीन मृतदेह सापडले आहेत ती माहिती खात्रीलयक नाही. या व्हॉईस मेसेजची बीड पोलिसांनी खात्री केली असता असा काहीएक प्रकार घडलेला नाही. ज्या इसमाने अंजली दमानिया यांना व्हाईस मेसेज पाठविला त्याने दारुच्या नशेत असे कृत्य केल्याचे निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी याप्रकरणी नागरिकांनाही आवाहन केले आहे की, कृपया अशी कोणतीही माहिती असल्यास आपण प्रथम पोलिसांशी संपर्क साधावा. आरोपीच्या शोधकार्यात अडथळा अथवा जनतेमध्ये संभ्रम निर्माण होईल अशा प्रकारची माहिती पसरवू नये किंवा वक्तव्य करू नये. काही उपयुक्त माहिती असल्यास बीड पोलीसांना कळवून तपास कार्यात सहकार्य करावे. या घटनेविषयी कोणाकडे माहिती असल्यास त्याने पोलीस अधिकाऱ्यास किंवा पोलिसांना द्यावी.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #beed#dhananjaymunde#MurderofSantoshDeshmukh#santoshDeshmukh
Previous Post

लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगो A – 320 या पहिल्या व्यावसायिक विमानाचे यशस्वी लँडिंग!

Next Post

सावकारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न! पुरंदर तालुका हादरला!

Next Post
सावकारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न! पुरंदर तालुका हादरला!

सावकारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न! पुरंदर तालुका हादरला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इंडिगो विमानात एका पीडित व्यक्तीस सहप्रवाशाने कानशिलात लगावली!

इंडिगो विमानात एका पीडित व्यक्तीस सहप्रवाशाने कानशिलात लगावली!

August 2, 2025
उच्चशिक्षित महिला! आठ पुरुषांसोबत लग्न!

उच्चशिक्षित महिला! आठ पुरुषांसोबत लग्न!

August 2, 2025
पुण्यातील यवतमधील वातावरण निवळते आहे!

पुण्यातील यवतमधील वातावरण निवळते आहे!

August 2, 2025
सगळेच निर्दोष, तर मग बॉम्बस्फोट घडवणारे कोण?

सगळेच निर्दोष, तर मग बॉम्बस्फोट घडवणारे कोण?

July 31, 2025
१७ वर्षांची प्रतीक्षा संपली. मालेगाव स्फोटातील सातही आरोपींची निर्दोष सुटका!

१७ वर्षांची प्रतीक्षा संपली. मालेगाव स्फोटातील सातही आरोपींची निर्दोष सुटका!

July 31, 2025
कल्याणी समुहातील वरिष्ठ अकाऊंटंटचे चाकणच्या हॉटेलातआत्महत्त्या प्रकरण!

कल्याणी समुहातील वरिष्ठ अकाऊंटंटचे चाकणच्या हॉटेलातआत्महत्त्या प्रकरण!

July 31, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.