DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

“प्राजक्ताबाबत विधान अतिशय निंदनीय!”

पण सोनियाजींचे बिकिनीतले फोटो आले होते तेव्हा...?

DD News Marathi by DD News Marathi
December 31, 2024
in ताज्या बातम्या, मनोरंजन, महाराष्ट्र, राजकीय
0
“प्राजक्ताबाबत विधान अतिशय निंदनीय!”

मुंबई प्रतिनिधी :
दि. ३१ डिसेंबर २०२४

बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येबाबत बोलत असताना भाजपा आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर टीका केली. त्याचवेळी त्यांनी प्राजक्ता माळी, रश्मिका मंदाना आणि सपना चौधरी यांची नावं घेतली. त्यामुळे सध्या प्राजक्ता माळी चर्चेत आलीये. सुरेश धस यांच्या विधानामुळे प्राजक्ता माळी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या प्रकरणासंबंधी अभिनेत्रीने सोमवारी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत तिने सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी केलीये.

सुरेश धस यांच्या विधानामुळे प्राजक्ताला आणि तिच्या कुटुंबियांना खूप त्रास झाला. प्राजक्ता माळीने यासंदर्भात महिला आयोगाकडे तक्रार केली असून लवकरच ती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार आहे. अभिनेत्रीला मराठी कलाकारांनी, दिग्दर्शकांनी आणि निर्मात्यांनी पाठिंबा दिला आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी, लोकप्रिय निर्माते नितीन वैद्य, कुशल बद्रिके, मुग्धा गोडबोले यांसारख्या अनेक कलाकारांनी प्राजक्ताला पाठिंबा दिलाय. अशातच आता मराठी अभिनेते किरण माने यांनीसुद्धा फेसबुकवर पोस्ट शेअर केलीये.

अभिनेते आणि शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी किरण माने यांनी पोस्ट शेअर करत लिहिलं की, ‘प्राजक्ताबाबतचे विधान निंदनियचं आहे…त्याचा निषेध. पण सोनियाजींचे बिकीनीवरचे फोटो व्हायरल झाले होते…कुस्तीगीर महिला लैंगिक शोषणाविषयी दाद मागत होत्या…मणिपूरला भगिनींची विटंबना झाली…तेव्हा जे महाभाग मूग गिळून गप्प बसले, त्यांना अचानक ‘समस्त महिला वर्गाविषयी’ भयानक पुळका वगैरे यावा हे फार विनोदी वगैरे आहे…

यापूर्वी करुणा मुंडे यांनी प्राजक्ता माळीबद्दल धक्कादायक विधान केलं होतं. त्याबद्दल सांगताना प्राजक्ता म्हणाली, तुम्ही महिला आहात. तुम्ही महिलांना होणारा त्रास समजू शकता, त्यामुळे आपण इथून पुढे कोणत्याही गोष्टीचा पुरावा असल्याशिवाय वक्तव्य करणार नाहीत, अशी खात्री बाळगते.

दरम्यान, किरण माने यांच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास त्यांनी ‘मुलगी झाली हो’, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे .

बातमी नक्की शेअर करा
Tags: #KiranMane#PrajaktaMali#SoniyaGandhi#SureshDhas
Previous Post

माझा पक्ष आपल्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा राहील! – आदित्य ठाकरे.

Next Post

‘प्राजक्ता माळीबद्दल जे घडतंय…!’ – सचिन गोस्वामी.

Next Post
‘प्राजक्ता माळीबद्दल जे घडतंय…!’ – सचिन गोस्वामी.

'प्राजक्ता माळीबद्दल जे घडतंय...!' - सचिन गोस्वामी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

झिरवळ प्रकरण तापलं; सुनेत्रा पवार नाराज!

झिरवळ प्रकरण तापलं; सुनेत्रा पवार नाराज!

February 17, 2026
संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

February 17, 2026
‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

February 17, 2026
“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

February 17, 2026
झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

February 17, 2026
अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

February 17, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.