DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

‘प्राजक्ता माळीबद्दल जे घडतंय…!’ – सचिन गोस्वामी.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या दिग्दर्शकांनी शेअर केली पोस्ट.

DD News Marathi by DD News Marathi
December 31, 2024
in ताज्या बातम्या, मनोरंजन, महाराष्ट्र, राजकीय
0
‘प्राजक्ता माळीबद्दल जे घडतंय…!’ – सचिन गोस्वामी.

मुंबई प्रतिनिधी :
दि. ३१ डिसेंबर २०२४

अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात विशेष चर्चेत आली आहे. बीडमधील भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आणि त्यावेळी त्यांनी रश्मिका मंदाना, सपना चौधरी प्राजक्ता माळी यांचा उल्लेख केला. त्यांच्या वक्तव्यानंतर प्राजक्ता माळीनेही मुंबईत पत्रकार घेत सुरेश धसांना जोरदार प्रत्युत्तर दिले, शिवाय तिने धसांविरोधात महिला आयोगात तक्रार देखील केली. प्राजक्तावर करुणा मुंडेंनी याआधी गंभीर आरोप केले होते, त्यांनाही प्राजक्ताने नोटीस पाठवली आहे. याप्रकरणी राजकीय मंडळींकडून प्रतिक्रिया समोर आल्या होत्या, आता प्राजक्ताच्या समर्थनार्थ ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दिग्दर्शक-लेखक सचिन गोस्वामी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. फेसबुकवर त्यांनी पोस्ट शेअर करत घडल्या प्रकाराचा निषेध केला.

सचिन गोस्वामी यांनी लिहिले की, ‘ज्या समाजात महिलांचा सन्मान राखला जातो तो समाज सभ्य समजला जातो. कलेचा आणि कलावंतांचा आदर जपणारा समाज सुसंस्कृत समाज असतो. प्राजक्ता माळीबाबत जे घडतंय ते निषेधार्ह आहे, क्लेषदायक आहे. आपण निकोप सुदृढ समाजाचा आग्रह धरू या.’ गोस्वामी यांनी फेसबुकवर शेअर केलेल्या या पोस्टचे समर्थन करणाऱ्या असंख्य कमेंट आल्या आहेत.

२८ डिसेंबर रोजी प्राजक्ताने पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी नाहीतर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. परंतु धस यांनी, “मी कोणतीही आक्षेपार्ह बाब बोललेलो नाही, त्यामुळे मी माफी मागणार नाही”, असे माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. यामुळे आता नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले होते सुरेश धस?

धस असे म्हणाले होते की, “कोणाला भविष्यात इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स करायचं असेल, तर त्यांनी परळीला या. इथून ज्ञान मिळवा आणि त्याचा प्रचार, प्रसार देशभरात करा. सपना चौधरी, रश्मिका मंदाना, प्राजक्ता माळीसुद्धा आमच्याकडे येतात. कोणाला नवीन चित्रपट काढायचा असेल, तर अशा मोठ्या विभूती आहेत, त्यांच्या तारखा कशा मिळतात, त्याचे धडे इथे घेता येतील. प्राजक्ता ताईही आमच्या इथे येतात… इव्हेंटसाठी. आमचा परळी पॅटर्न आहे.’

बातमी नक्की शेअर करा
Tags: #MaharashtrachiHasyajatra#PrajaktaMali#SachinGoswami#SureshDhas
Previous Post

“प्राजक्ताबाबत विधान अतिशय निंदनीय!”

Next Post

भारत – चीन सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला!

Next Post
भारत – चीन सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला!

भारत - चीन सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

झिरवळ प्रकरण तापलं; सुनेत्रा पवार नाराज!

झिरवळ प्रकरण तापलं; सुनेत्रा पवार नाराज!

February 17, 2026
संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

February 17, 2026
‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

February 17, 2026
“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

February 17, 2026
झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

February 17, 2026
अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

February 17, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.