DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

बिल्डरने जमीन हडपल्याने पुण्यातील कुटुंब आत्मदहन करणार!

मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हे कृत्य करणार.

DD News Marathi by DD News Marathi
January 10, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
बिल्डरने जमीन हडपल्याने पुण्यातील कुटुंब आत्मदहन करणार!

पुणे प्रतिनिधी :
दि. १० जानेवारी २०२५

पुण्यातील कोंढवा परिसरात राहणाऱ्या कापरे कुटुंबीयांची वडिलोपार्जित जमीन हडपण्याचा प्रयत्न दोन नामांकित बिल्डर करत आहेत. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असतानाही, या दोन बिल्डरांनी जबरदस्तीने ताबा घेण्याचा प्रयत्न केला. डिसेंबर २१ रोजी बिल्डरने गुंड पाठवून ताबा घेण्याचा प्रयत्न केला आणि आजही तिथेच ठाण मांडून बसले आहेत.

या विरोधात कापरे कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केले, परंतु पोलीस प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्यामुळे, आता थेट मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे. बिल्डर आणि त्यांच्या गुंडांकडून होणाऱ्या सततच्या त्रासामुळे हा निर्णय घेतल्याचे कुटुंबीयांनी सांगितले आहे.

अक्षय सुभाष कापरे यांच्या कोंढवा येथील सर्व्हे क्रमांक ३१ आणि सर्व्हे क्रमांक ३२ या ठिकाणी ३ ते ४ गुंठे जमीन आहे. या जमिनीवर नामांकित बिल्डर सुरेंद्र अगरवाल आणि सुजय श्रेणिक शहा यांनी जबरदस्तीने घुसखोरी करून ताबा घेतला आहे. याविरुद्ध कापरे कुटुंबीयांनी पुण्यात आंदोलन केले होते. जमिनीचा हा वाद २०१४ पासून सुरू आहे. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल आहे; मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे आता कापरे कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे.

“कोंढवा येथे आमच्या जमिनीवर ताबा घेण्याचा प्रयत्न गेली अनेक वर्षे सुरू आहे. बिल्डरांनी खोटी कागदपत्रे तयार करून कोर्टात पुरावे सादर केले. सत्र न्यायालयात निकाल आमच्या बाजूने लागला, पण उच्च न्यायालयात निकाल आमच्या विरोधात गेला. त्यामुळे आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. तथापि, शहा आणि अगरवाल बिल्डर २०१३ पासून आम्हाला त्रास देत आहेत. आमच्या जमिनीवरची शासकीय चंदनाची झाडेसुद्धा त्यांनी कापली आहेत. या संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन केले. तक्रार दाखल करूनही, आमच्या जागेवर गुंडांनी बेकायदेशीर ताबा घेतला आहे. आम्हाला या सरकारकडून न्यायाची अपेक्षा आहे. म्हणून आम्ही सर्व कुटुंबीय मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर रॉकेल ओतून आत्मदहन करणार आहोत.”

दरम्यान, या संदर्भात अगरवाल आणि शहा बिल्डर्सची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र कोणत्याही मार्गाने त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #Atmadahan#Enforcement_Builder#KondhwaPune
Previous Post

HMPV विषाणूबद्दल मिळाली महत्त्वाची माहिती!

Next Post

प्रदेशाध्यक्ष बदलण्याची कार्यकर्त्याची शरद पवारांकडे मागणी!

Next Post
प्रदेशाध्यक्ष बदलण्याची कार्यकर्त्याची शरद पवारांकडे मागणी!

प्रदेशाध्यक्ष बदलण्याची कार्यकर्त्याची शरद पवारांकडे मागणी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्मशानभूमीतून बाहेर पडली ‘आनंदलेली’ भुतं!

स्मशानभूमीतून बाहेर पडली ‘आनंदलेली’ भुतं!

August 2, 2025
‘श्यामची आई’ सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार!

‘श्यामची आई’ सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार!

August 2, 2025
मिठी नदी प्रकरणी ६५ कोटी रुपयांचा घोटाळा!

मिठी नदी प्रकरणी ६५ कोटी रुपयांचा घोटाळा!

August 2, 2025
इंडिगो विमानात एका पीडित व्यक्तीस सहप्रवाशाने कानशिलात लगावली!

इंडिगो विमानात एका पीडित व्यक्तीस सहप्रवाशाने कानशिलात लगावली!

August 2, 2025
उच्चशिक्षित महिला! आठ पुरुषांसोबत लग्न!

उच्चशिक्षित महिला! आठ पुरुषांसोबत लग्न!

August 2, 2025
पुण्यातील यवतमधील वातावरण निवळते आहे!

पुण्यातील यवतमधील वातावरण निवळते आहे!

August 2, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.