DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

प्रदेशाध्यक्ष बदलण्याची कार्यकर्त्याची शरद पवारांकडे मागणी!

जयंत पाटलांसमोरच वाचली यादी.

DD News Marathi by DD News Marathi
January 11, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
प्रदेशाध्यक्ष बदलण्याची कार्यकर्त्याची शरद पवारांकडे मागणी!

मुंबई प्रतिनिधी :
दि. ११ जानेवारी २०२५

विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात बैठकांना सुरुवात झाली आहे. पराभवाचं विश्लेषण करुन पुढील वाटचालीच्या दृष्टीनं शरद पवार आखणी करत आहेत. काल पवारांनी आमदार, खासदारांसोबत चर्चा केली. त्यानंतर आज त्यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष हजर होते. पक्षाच्या सगळ्या आघाड्या, सेल, विभागांचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांचीही उपस्थिती होती.

शरद पवारांनी पदाधिकाऱ्यांच्या भावना, मागण्या यावेळी जाणून घेतल्या, काही कार्यकर्तेदेखील या बैठकीला हजर होते. यावेळी एका कार्यकर्त्यानं शरद पवारांसमोर प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी केली. यावेळी विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तिथेच उपस्थित होते. त्यांच्यासमोरच कार्यकर्त्यानं भूमिका मांडली. सगळ्या सेल, विभागांचे पदाधिकारी, अध्यक्ष बदला, अशी मागणीदेखील या कार्यकर्त्यानं केली.

‘पक्षाला आता नवा प्रदेशाध्यक्ष मिळायला हवा. संघटनात्मक बदल पक्षासाठी गरजेचे आहेत. नवा प्रदेशाध्यक्ष मराठेतर असावा. त्याचा पक्षाला फायदा होईल. नवा प्रदेशाध्यक्ष पक्षाला वेळ देणारा असावा,’ अशी अपेक्षा कार्यकर्त्यानं शरद पवारांकडे व्यक्त केली. ‘जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष बदलण्यात यावेत. सगळ्या आघाड्या, विभागांचे अध्यक्षदेखील बदलले जावेत,’ अशी मागणी कार्यकर्त्यानं केली.

विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाचे केवळ १० उमेदवार विजयी झाले आहेत. त्यात रोहित पवार, रोहित पाटील या तरुण आमदारांचा समावेश आहेत. रोहित पाटील अवघ्या २५ व्या वर्षी आमदार झाले आहेत. पक्षाच्या भवितव्याच्या दृष्टीनं या दोघांवर मोठी जबाबदारी देण्यात यावी, अशी मागणी होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शरद पवार संघटनात्मक फेरबदल करत भाकरी फिरवण्याच्या तयारीत आहेत. यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांना विचारण्यात आलं. तेव्हा तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय असल्याचं अजित पवार म्हणाले. ‘माझा त्याच्याशी कोणताही संबंध नाही. माझा पक्ष, माझं चिन्ह वेगळं आहे. तो त्यांचा अंतर्गत विषय आहे. त्याबद्दल निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार त्यांचा आहे. त्यात लुडबूड करण्याचा काडीमात्र अधिकार मला नाही,’ असं अजित पवारांनी म्हटलं.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #JayantPatil#NCP#Pradeshadhyaksh#SharadPawar
Previous Post

बिल्डरने जमीन हडपल्याने पुण्यातील कुटुंब आत्मदहन करणार!

Next Post

आमदार सुरेश धस यांचे मुन्नीबद्दल परत मोठे विधान!

Next Post
आमदार सुरेश धस यांचे मुन्नीबद्दल परत मोठे विधान!

आमदार सुरेश धस यांचे मुन्नीबद्दल परत मोठे विधान!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

झिरवळ प्रकरण तापलं; सुनेत्रा पवार नाराज!

झिरवळ प्रकरण तापलं; सुनेत्रा पवार नाराज!

February 17, 2026
संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

February 17, 2026
‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

February 17, 2026
“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

February 17, 2026
झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

February 17, 2026
अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

February 17, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.