DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

सुसंवाद नसेल तर कुठलीच आघाडी यशस्वी होत नाही!

काँग्रेसने ही जबाबदारी घेणे अपेक्षित - संजय राऊत

DD News Marathi by DD News Marathi
January 13, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
सुसंवाद नसेल तर कुठलीच आघाडी यशस्वी होत नाही!

मुंबई प्रतिनिधी :
दि. १३ जानेवारी २०२५

आज काँग्रेसला सामनाच्या अग्रलेखात चांगलंच सुनावण्यात आलं आहे. काँग्रेसच्या संस्कृतीला , दिल्ली निवडणुकीसाठी केजरीवाल यांना देशद्रोही ठरवून प्रचाराचा मुद्दा करणे शोभत नाही, असं यात म्हटलं गेलं. त्यानंतर आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी याबाबत बोलताना म्हटलं की, तुम्ही असं का म्हणताय की सामनाच्या संपादकीयमध्ये काँग्रेसवर सडकून टीका केली आहे? तसं नसून त्यामध्ये इंडिया आघाडीचं मन मोकळं केलं आहे. इंडिया आघाडीविषयी असलेल्या आमच्या घटकपक्षातील नेत्यांच्या भावना त्यात व्यक्त केल्या आहेत.

“इंडिया आघाडी अधिक मजबूत व्हावी, टिकावी आणि देशाच्या राजकारणात अधिक पुढे जावी, ही आमच्या सर्वांची इच्छा आहे, पण गेल्या काही दिवसांपासून आमचे काही घटकपक्ष या भूमिकेत आहेत की त्यामुळे संवाद तुटला आहे. संवाद तुटला तर कुठलीच आघाडी यशस्वी होत नाही. शिवसेना भाजप युतीमध्ये संवाद तुटला म्हणून युती तुटली. २०१९ मध्ये योग्य संवाद झाला नाही म्हणून युती तुटली”, असं संजय राऊत म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “इंडिया आघाडीमध्ये ३० पक्षांशी संवाद ठेवण्यासाठी काही जबाबदार नेत्यांची नियुक्ती झाली पाहिजे हे उद्धव ठाकरेंनी इंडिया आघाडीच्या बैठकीत अनेकदा सांगितलं आहे. ओमर अब्दुल्ला म्हणाले होते की, ही आघाडी लोकसभा निवडणुकीसाठी तयार झाली. लोकसभेत या आघाडीने चमकदार कामगिरी केली, लोकसभेत नरेंद्र मोदी यांचं बहुमत संपवून टाकलं. त्यामुळे ही आघाडी टिकली पाहिजे. संसदेच्या बाहेरही आम्ही काम केलं पाहिजे”.

“ज्याप्रकारे हुकुमशाही पुन्हा एकदा डोकं वर काढत आहे, ही बाब चिंताजनक आहे. आमच्या आघाडीतील मोठा पक्ष म्हणून ही जबाबदारी सर्वात जास्त काँग्रेस नेतृत्त्वाची आहे. ही त्यांनीच घ्यायला पाहिजे”.

“एकमेकांविरोधात निवडणुका लढणे काही चुकीचं नाही, पण असं करताना आपण आपल्या एकेकाळच्या सहकाऱ्यांना, भविष्यात लोकसभेला एकत्र येणार आहोत असं चित्र असेल तर त्यांना अगदी देशद्रोही ठरवण्यापर्यंत कोणीही जाऊ नये, अशी उद्धव ठाकरेंची भूमिका आहे”.

अमित शाहांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, “शरद पवार आणि उद्धव ठाकरे भाजपची रोजीरोटी आहे. दगाफटका कोणी केला, गद्दारांना सोबत घेऊन सरकार बनवलं आणि कोण दगाफटक्याच्या गोष्टी करत आहेत. या देशात जर कोणी दगाफटका, बेईमानीला खतपाणी घातलं असेल तर ते भाजपने आणि खासकरुन नरेंद्र मोदी आणि अमित शाहांनी घातलं”.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AmitShah#MahavikasAghadi#NarendraModi#SanjayRaut
Previous Post

मुंबई उच्च न्यायालयानं मोदींची याचिका फेटाळली!

Next Post

अमेरिकेतील लॉस एंजेलिसच्या वणव्यात आतापर्यंत २४ जणांचा दुर्दैवी मृत्यू!

Next Post
अमेरिकेतील लॉस एंजेलिसच्या वणव्यात आतापर्यंत २४ जणांचा दुर्दैवी मृत्यू!

अमेरिकेतील लॉस एंजेलिसच्या वणव्यात आतापर्यंत २४ जणांचा दुर्दैवी मृत्यू!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

October 17, 2025
राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

October 17, 2025
‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

October 17, 2025
कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

October 16, 2025
प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

October 16, 2025
मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

October 16, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.